Home Breaking News Bhadrawati taluka @news • समता सैनिक दलाचे सैनिक डाॅ.एल.आर.बाली यांना...

Bhadrawati taluka @news • समता सैनिक दलाचे सैनिक डाॅ.एल.आर.बाली यांना भारतीय राज्य घटनेच्या उद्देशिकाचे वाचन करून आदरांजली अर्पण

302

Bhadrawati taluka @news
• समता सैनिक दलाचे सैनिक डाॅ.एल.आर.बाली यांना भारतीय राज्य घटनेच्या उद्देशिकाचे वाचन करून आदरांजली अर्पण

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत : तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती- डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारां सोबत प्रामाणिक पणे एकनिष्ठ राहून आंबेडकरी विचारांचा प्रसार आणि प्रसार अखेर च्या श्वास पर्यंत भारतासह जगात आपल्या मार्गदर्शनातून व लेखणीने पोहोचायचं कार्य करणारे,आंबेडकरी आंदोलनाचे निडर योद्धा,प्रसिद्ध लेखक, पत्रकार व समता सैनिक दलाचे सैनिक स्मृतीशेष डाॅ. एल.आर.बाली सर यांचे दि.06 जुलै 2023 ला वयाच्या 92 वर्षी निधन झाले.
एक समर्पित,निष्ठावंत, तडफदार व्यक्ती चे निघून जाने आंबेडकरी चळवळीतील फार मोठी हानी आहे.अशा समता सैनिक दलाच्या सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंचशील नगर,भद्रावती येथे अ.भा.समता सैनिक दल भद्रावती च्या वतीने आदरांजली सभा घेण्यात आली.
आदरांजली सभेला समता सैनिक दल,भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या कार्यकर्ते सर भद्रावती परिसरातील आंबेडकरी बौद्ध अनुयायी कडून डाॅ.एल.आर.बाली सर यांना तथागत बुद्ध व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून व भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करून आदरांजली वाहण्यात आली.
श्रद्धांजली कार्यक्रम राजदिप सर अ.भा. समता सैनिक दल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. मार्शल अविनाश दिग्विजय,प्रा.राजदीप सर,श्रीधर सातपुते,सिद्धार्थ सुमन,मनोज मोडक,उमेश मैत्रेय,संदानंद वाघ,सुरेखा रामटेके,लिनता जुनघरे यांनी डाॅ.एल.आर.बाली सर यांच्या कार्याचा संदेश मार्गदर्शनातून उपस्थित बौद्ध उपासक-उपासिका यांना दिला. सुत्र संचालन कवडू कांबळे यांनी केले.