Home Breaking News Chimur taluka@ news • भिसी येथे मोफत रोगनिदान शिबिर -अनेकांनी घेतला शिबिराचा...

Chimur taluka@ news • भिसी येथे मोफत रोगनिदान शिबिर -अनेकांनी घेतला शिबिराचा लाभ

67

Chimur taluka@ news
• भिसी येथे मोफत रोगनिदान शिबिर -अनेकांनी घेतला शिबिराचा लाभ

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चिमूर :चिमूर तालुक्यातील
भिसी येथे आज बुधवारला श्री छत्रपती शाहू महाराज बहू उद्दे. मंडळ भिसी,शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर , डॉ.बाबासाहेब आंबेडकर सुपर स्पेशालिटी इन्स्टिट्यूट वानाडोंगरी नागपूर ,जीवनदाई आरोग्य विकास फाउंडेशन , यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य निशुल्क आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर पार पडले .

आरोग्य शिबिरात भिसी व या परिसरातील 921 रुग्णांनी लाभ घेतला .त्यापैकी अतिविशेष म्हणून 128 रुग्णांना पुढील उपचाराकरिता उद्या दिनांक 20 जुलै पासून टप्याटप्याने भरती करण्यात येणार आहे , तसेच 81 रुग्णांची ECG करण्यात आली , 224 रुग्णांची शुगर तपासणी करण्यात येऊन त्यांना औषधी देण्यात आली .
शिबिराचे उद्घाटन माजी अध्यक्ष विठ्ठल रुखमाई देवस्थान भिसीचे बाबुराव बोमेवार यांचे हस्ते झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजभे हे होते तर याच शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार प्रकाश राऊत घनश्याम डुकरे, गरिबा निमजे , विजय घरत ममता डुकरे , गोपाल बलदुआ जेष्ठ भाजपा नेते सचिन गाडीवार , कृष्णा तेजने डॉ.पिसे डॉ.हेमंत जुनोजा मेडीसिन, उमेश कडू , राहुल चिंचलकुलवार , डॉ.कमलजीत कौर डॉ.मयूर दुधे डॉ. संदीप खंडारे डॉ. केवल ढोणे आदी उपस्थित होते. प्रा. आनंद भिमटे यांचा झाडीपट्टी नाट्य रंगभूमी मध्ये उत्कृष्ठ नाट्य लेखनाबद्दल व पवन दिघोरे यांचा कला व वाणिज्य महाविद्यालय भिसी आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथून ते बि. ए. अंत्य वर्षाला विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाल्याबददल त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन या वेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बजरंग दल, टायगर ग्रूप, कमांडो ग्रूप व छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर आष्टनकर यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार परवेज शेख यांनी मानले.