Home Breaking News ⬜🔸- लेखणीच्या टोकावर-🔸⬜

⬜🔸- लेखणीच्या टोकावर-🔸⬜

401

⬜🔸- लेखणीच्या टोकावर-🔸⬜

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

◽▪️◽लेखणीच्या टोकावर
शब्द शब्द डोलतात
मनातले जग जणू
अलवार खोलतात.

◽▪️◽शब्द लागता वाहू
घेई काळजाचा ठाव
कधी कोणत्या सुरांचा
भासे वेगळाच भाव.

◻️▪️◻️शब्द शब्द माळेमध्ये
माझी लेखणी गुंफिते
मनातल्या भावनांना
मनोमन ते चुंबिते.

◽▪️◽सडा पडे लिखाणाचा
शब्द अंगण फुलवी
कल्पनेच्या रांगोळीत
शब्द रंगती खुलवी.

◻️▪️◻️लेखणीत सामावते
सर्व मनातले गूढ़
स्पर्श शब्दांचा खुलून
होतो हृदयीं आरूढ.

◻️🔸वैशाली राऊत, सहज सुचलं सदस्य नागपूर