Home Breaking News Ballarpur taluka@ news • विसापुर वासीचा भूमिगत कोळसा खाणी ला विरोध

Ballarpur taluka@ news • विसापुर वासीचा भूमिगत कोळसा खाणी ला विरोध

240

Ballarpur taluka@ news
• विसापुर वासीचा भूमिगत कोळसा खाणी ला विरोध

✍️संजय घुग्लोत
सुवर्ण भारत:उपसंपादक

बल्लारपूर :- बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे भिवकुंड भूमिगत कोळसा खाणी ला विरोध करण्याकरिता सभेचे आयोजन करण्यात आले होते. श्री पंढरीनाथ देवस्थान मंगल कार्यालयात ग्रामसभा आयोजित सभेत सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीला विसापूर गावाच्या हद्दीतील भिवकुंड कोलब्लॉक भूमिगत कोळसा खाण म्हणून केंद्र सरकारने दिली आहे. कोळसा खाणीमुळे आपण विस्थापित होणार म्हणून अनेक शेतकऱ्यांनी भावना व्यक्त केल्या. ग्रामसभेच्या माध्यमातून विसापूर गावाच्या हद्दीत कोळसा खाण होऊ नये, म्हणून ठराव पारीत केला. विसापूरकरांनी भिवकुंड कोळसा विरोध केल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल म्हणून आशा वाटत आहे.
विसापूर येथील शेतकऱ्यांनी ग्रामपंचयातकडे विसापूर गावाच्या हद्दीत होऊ घातलेल्या भूमिगत कोळसा खाणीबाबत ग्रामसभा घेण्याची विनंती केली होती. वर्धा व्याली कोल्फिल्ड अंतर्गत बल्लारपूर तालुक्यातील विसापूर व नांदगाव (पोडे ) गावाच्या शेत शिवारात भिवकुंड कोलब्लॉक भूमिगत कोळसा खाणपट्टा केंद्र सरकारने सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीला कोळसा उत्खननाकरिता दिला आहे. तब्बल ८०२ हेक्टर जमिनिअंतर्गत केंद्र सरकारच्या कोल मंत्रालयाने परवानगी दिली आहे. याबाबत सदर कंपनीने सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण उजकरण्यासाठी हालचाल सुरू केली आहे.
भिवकुंड भूमिगत कोळसा खाणीविरोधात विसापूरच्या सरपंच वर्षा कुलमेथे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. यावेळी सभेत उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, मधुकर भोयर, प्रीतम पाटणकर, संदीप पोडे, सूरज टोमटे, प्रदीप गेडाम, नरेंद्र इटनकर, माजी सरपंच बंडू गिरडकर, सुरेश पंदीलवार प्रभाकर टोंगे आदींनी विसापूर गावात भूमिगत कोळसा खाण अथवा कोणत्याही प्रकारची खाण भविष्यात होऊ नये म्हणून भूमिका मांडली. या भूमिकेला ग्रामसभेत उपस्थित जवळपास १५० च्यावर नागरिकांनी विरोध दर्शवून भिवकुंड भूमिगत कोळसा खाणीला विरोध केला. विसापूर ग्रामपंचायतीने या संदर्भात कोणत्याही प्रकारचा ठराव शासनाकडे देऊ नये म्हणून भूमिका घेतली..