Home Breaking News Chandrapur city @news • तोगरे कुटूंबांचे चंद्रपूरात बेमुदत धरणे आंदोलन आंदोलनाचा दहावा...

Chandrapur city @news • तोगरे कुटूंबांचे चंद्रपूरात बेमुदत धरणे आंदोलन आंदोलनाचा दहावा दिवस ! • पोलिस अधिकारी पोहचले आंदोलन स्थळी! • जिवन तोगरे हत्या प्रकरण !

613

Chandrapur city @news
• तोगरे कुटूंबांचे चंद्रपूरात बेमुदत धरणे आंदोलन आंदोलनाचा दहावा दिवस !
• पोलिस अधिकारी पोहचले आंदोलन स्थळी!
• जिवन तोगरे हत्या प्रकरण !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील दोन दलीत तरुणांच्या हत्येची सीबीआय मार्फत सखोल चौकशी करून या घटनेतील आरोपींवर ॲट्रासिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी लोकस्वराज्य आंदोलन समितीने केली असून याच मागणीच्या अनुषंगाने तोगरे कुटुंबातील सर्व सदस्य गेल्या नव दिवसांपासून चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे. आज या धरणे आंदोलनचा दहावा दिवस असल्याचे तोगरे कुटुंबातील एका सदस्याने या प्रतिनिधीस एका भेटी दरम्यान सांगितले.
दरम्यान या आंदोलनास्थळी काही पोलिस अधिका-यांनी आज दुपारी भेट दिली असल्याचे वृत्त आहे ‌एव्हढेच नाही तर धरणे आंदोलनात बसलेल्या व्यक्तींशी त्यांनी चर्चा केली .त्या नंतर एका वरिष्ठ पोलिस अधिका-यांकडे एका शिष्टमंडळाने आज भेट दिली.
उपरोक्त दोन्ही प्रकरणात फेर चौकशी करण्याची मागणी तोगरे परिवारासह अनेकांनी केली असून विदर्भ मुक्ती मोर्चाने या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
संतोष शिंदे व जिवन राजाराम तोगरे या दोन्ही तरुण युवकांची आत्महत्या नसून त्यांची कट रचून हत्या करण्यात आली असल्याचे तोगरे परिवारचे म्हणणे आहे.जिवन यांच्या हत्येची पिटीगुड्डा पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिका-यांनी व पोलिस कर्मचाऱ्यांनी योग्य चौकशी केली नसल्याचे एकंदरीत निदर्शनास येत असल्याचे लोकस्वराज्य आंदोलनने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत या पूर्वीच पाठविलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.दलीत तरुणांच्या हत्या संदर्भात योग्य चौकशी न केल्यामुळे त्या अधिकाऱ्यांना सहआरोपी करत त्यांचेवर ३०२अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा या शिवाय त्या तरुणांच्या हत्ये संबंधीचुकीचा वैद्यकीय अहवाल दिल्या प्रकरणी त्या अधिकाऱ्यांवर देखिल ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात यावा . अशी मागणी त्यांनी केली आहे .धरणे आंदोलन स्थळी अनेक सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देवून या आंदोलनाची आज माहिती जाणून घेतली आहे.