Home Breaking News Gondpipri taluka@ news • महाराष्ट्र- तेलंगाणा राज्य सीमा महामार्ग बंद,कडेकोट सुरक्षा व्यवस्था...

Gondpipri taluka@ news • महाराष्ट्र- तेलंगाणा राज्य सीमा महामार्ग बंद,कडेकोट सुरक्षा व्यवस्था • वर्धा नदीच्या जुना पोडसा पुलावर एक फूट पाणी,अनोळखी इसमाचे प्रेत नदीपात्रातून वाहून आले

82

Gondpipri taluka@ news
• महाराष्ट्र- तेलंगाणा राज्य सीमा महामार्ग बंद,कडेकोट सुरक्षा व्यवस्था

• वर्धा नदीच्या जुना पोडसा पुलावर एक फूट पाणी,अनोळखी इसमाचे प्रेत नदीपात्रातून वाहून आले

✍️विनोद पाल
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी, गोंडपिपरी

गोंडपिपरी: गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले असून पूरपरिस्थितीमुळे अनेकांचे कुटुंब बेघर झाले आहे तर काहीना आपल्या आप्तनातेवाईकांना मुकावे लागले आहे.गोंडपीपरी तालुक्यातील जुना पोडसा येथील वर्धा नदीच्या पुलावरून एक फूट पाणी असल्यामुळे पोलीस प्रशासानाकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन राज्यांना जोडणारा महाराष्ट्र – तेलंगाणा राज्य सीमा महामार्ग कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत बंद करण्यात आला.तसेच वर्धा नदीच्या प्रवाहात एका अनोळखी इसमाचे प्रेत वाहून आले आहे.

गेल्या वर्षी आलेल्या सततच्या पुरामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके नासधुस झाली त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी बनला परंतु यावर्षी नव्या जोमाने आपण शेतीत राबून कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडू असा हेतू धरून नवीन पिके जोमाने उभी झाली परंतु अचानक आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण आशेवर पाणी फिरले आहे.गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा नदी तुडुंब भरली आहे.महाराष्ट्र – तेलंगाणा या दोन महत्वाच्या राज्यांना जोडणाऱ्या वर्धा नदीच्या जुना पोडसा पुलावर एक फूट पाणी असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता लाठी पोलीस स्टेशनकडून खबरदारी म्हणून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मार्ग बंद करण्यात आला.अशातच एका अनोळखी इसमाचे प्रेत नदी प्रवाहात वाहून आल्याने पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.सविस्तर वृत्त लिहीपर्यंत मृतकाची ओळख पटली नाही.