Home Breaking News Gadchiroli dist@ news • मनस्वी मंचच्या वतीने गडचिरोलीच्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कुसुम...

Gadchiroli dist@ news • मनस्वी मंचच्या वतीने गडचिरोलीच्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कुसुम ताई अलाम यांचा सत्कार! • कार्यक्रमाला कलावंत प्रतिक्षा शिवणकर यांची उपस्थिती !

89

Gadchiroli dist@ news
• मनस्वी मंचच्या वतीने गडचिरोलीच्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कुसुम ताई अलाम यांचा सत्कार!
• कार्यक्रमाला कलावंत प्रतिक्षा शिवणकर यांची उपस्थिती !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

गडचिरोली: दै.देशोन्नती गडचिरोलीच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त मनस्विनी मंचच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहकार महर्षी अरविंद पोरेड्डीवार यांचे हस्ते गडचिरोलीच्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व विदर्भातील सुपरिचित साहित्यिका कुसुम ताई अलाम यांचा सत्कार करण्यात आला.दरम्यान गडचिरोली येथे जागतिक स्तरावरील पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते .
त्या निमित्ताने अलाम यांना हा विशेष पुरस्कार बहाल करण्यात आला.मनस्विनीच्या प्रमुख सुलभा धामोळे व मनस्विनीच्या अन्य सदस्य मंडळींनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.तदवतच मनस्विनीच्या माध्यमातून दै .देशोन्नतीने गडचिरोली जिल्ह्यातील शेकडों महिलांना लिहिते केले.दोन सत्रात पार पडलेल्या कार्यक्रमात लावणी व मंगळागौर नृत्य सादर करण्यात आले.
समाजातील अनेक भगिनींना प्रमाणपत्र देऊन या वेळी सन्मानित करण्यात आले. वैचारिक दर्जाचे लेखन करणा-या महिलांचे कौतुकास्पद कार्याचा तो एक गौरव होता. दरम्यान गडचिरोलीची कलावंत प्रतिक्षा शिवणकर ही प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थित होती.अनेक मराठी मालिकेत तिने महत्वाची भूमिका वठविली आहे.
अभिनय क्षेत्रातील तिची प्रभावीपणे वाटचाल ही गडचिरोली साठी एक गौरवाची बाब आहे.आयोजित कार्यक्रमाला डॉ. नामदेव किरसान, प्रा.राजेश कात्रटवार,आ. कृष्णा गजबे आ.डॉ. देवराव होळी ,स्मिता लडके यांची उपस्थिती लाभली होती. सदरहु कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनिल धामोळे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संध्या येलेकर यांनी केले . उपस्थितीतांचे आभार गायत्री सोमनकर यांनी मानले.