Home Breaking News Chandrapur dist@ news • “त्या” गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर...

Chandrapur dist@ news • “त्या” गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करा- राजू झोडेंची मागणी

117

Chandrapur dist@ news
• “त्या” गोळीबार प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करा- राजू झोडेंची मागणी

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर: जिल्ह्यात पुन्हा गुन्हेगारीने डोकं वर काढले असून राजुरा तालुक्यातील सोमनाथपुर वार्डात अवैध कोळसा तस्करी प्रकरणातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री उघडकीस आली आहे.या घटनेत एका महिलेचा नाहक बळी गेला.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून अटकेत असलेल्या दोन आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी व वाढत असलेली गुन्हेगारी ठेचून काढावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी आज केली
दरम्यान या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत.याच कोळसा खाणीतून मागील अनेक दिवसांपासून अवैध कोळसा तस्करी सुरू असून राजकीय पार्श्वभूमी असलेल्या काही तस्करांकडून कोळसा तस्करी जोमात सुरू आहे. राजुरा, साखरी, पैनगंगा, सास्ती,मुंगोली अशा सर्वच कोळसा खाणीत परप्रांतीय गुंड प्रवृत्तीच्या काही इसमाकडून हे काम सर्रास सुरू आहे.यातूनच जिल्ह्यात गुन्हे घडत आहेत.पोलिस प्रशासनाच्या नाकावर टीच्चून बंदुका,सुरे, लाठ्या काठ्यांचा धाक दाखवून कोळसा तस्करी सुरू असल्याचे झोडे यांचे म्हणणे आहे.
गुंडप्रवृत्तीच्या लोकांना प्रशासनाचा कुठलाही धाक राहिला नसून मागील अनेक दिवसांपासून राजकीय व आर्थिक वर्चस्वासाठी कोळसा तस्करी सर्रासपणे सुरू आहे. अशातच रविवारी राजुरा शहरात सचिन डोहे यांच्या घरी काल रात्री अज्ञात आरोपींनी गोळीबार केला.यात त्यांच्या पत्नी पूर्वशा डोहे यांचा मृत्यू झाला तर याच घटनेत एक जण जखमी झाला आहे.या जिल्ह्यात परत एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले असून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी घटनेची गांभीर्याने चौकशी करून आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करावी, कोळसा खाणीत कार्यरत असलेल्या खासगी कंपनीतील कामगारांची चारित्र्य पळताळणी करावी, बंदुकीच्या परवान्यांची चौकशी करावी अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी कडक कायदा करावा अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून केली आहे.