Home Breaking News Chandrapur dist@ news • मणिपूर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी चंद्रपूरकरांचा निघाला शहरात विशाल...

Chandrapur dist@ news • मणिपूर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी चंद्रपूरकरांचा निघाला शहरात विशाल आक्रोश मोर्चा! • मोर्चात अनेकांचा सहभाग!

177

Chandrapur dist@ news
• मणिपूर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी चंद्रपूरकरांचा निघाला शहरात विशाल आक्रोश मोर्चा!
• मोर्चात अनेकांचा सहभाग!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:मणिपूर येथे महिलांची नग्न धिंड काढून त्यांचेवर लैंगिक अत्याचार करुन त्यांची हत्या केल्याची घटना घडलेली आहे .तेथील क्रूर समुदायाने मागील तीन महिन्यांपासून असहाय जनतेवर अत्यंत क्रूर हल्ले करुन निष्पाप बालक व महिलांसह शेकडों लोकांची अमानुषपणे हत्या केली आहे .अन्याय व क्रूर अत्याचाराचे सत्र आजतागायत सुरूच आहे. राज्य व केंद्र सरकार हे सर्व अत्याचार उघड्या डोळ्यांनी बघत बसले आहे. ह्या अमानुष अत्याचार मालिकेचा व त्यांच्या पाठीराख्यांचा निषेध करण्यासाठी चंद्रपूर शहरातील स्थानिक गांधी चौकातून आज सोमवार दि.२४जूलैला दुपारी १२वाजता एका भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते .या जनमोर्चात चंद्रपूरकरांनी स्वयंस्फूर्तीने आपला सहभाग नोंदविला.दरम्यान एक दिवस अगोदरच या मोर्चात चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले होते .त्या आवाहनाला शहरातील पुरुष ,महिला, तरुण व तरुणींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे प्रत्यक्षात दिसून आले . आजच्या मोर्चाने जनतेसोबतच शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले हे मात्र तितकेच खरे! स्थानिक गांधी चौक स्थित महानगरपालिका प्रांगणातून निघालेल्या या मोर्चाने दुपारी चार वाजता थेट चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.त्या ठिकाणी एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना एक लेखी निवेदन सादर केले.मुख्य मार्गाने जोरदार घोषणाबाजी देत निघालेल्या या मोर्चाने आज अनेकांचे लक्ष वेधले होते.मोर्चा दरम्यान पोलिस प्रशासनाने तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.