Home Breaking News Bhadrawati taluka @news • कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिक संघातर्फे परमानंद...

Bhadrawati taluka @news • कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिक संघातर्फे परमानंद तिराणिक यांचा सत्कार

84

Bhadrawati taluka @news
• कारगिल विजय दिनानिमित्त माजी सैनिक संघातर्फे परमानंद तिराणिक यांचा सत्कार

✍🏻मनोज मोडक
सुवर्ण भारत: तालुका प्रतिनिधी, भद्रावती
भद्रावती:माजी सैनिक संघ, एअर बाँर्न ट्रेनिंग सेंटर वरोरा, स्व.मोरेश्वर टेमुर्डे चँरिटेबल ट्रस्ट, स्व.डाँ. विनायकराव वझे मेमोरियल व पैगाम साहित्य मंच वरोराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कटारिया मंगल कार्यालयात ‘कारगिल विजय दिवस’ व माजी सैनिक मेळाव्यात’ दिव्यांग कल्याण संस्था चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त अध्यक्ष परमानंद तिराणिक यांची निवड झाल्याबद्दल तसेच शंभर पुरस्काराचे मानकरी ठरुन शतक पुर्ण केल्याबद्दल वरोऱ्याचे नाही तर चंद्रपूर जिल्ह्याचे ते भुषण ठरल्यामुळे त्यांचा वरोरा नगरीच्यावतीने ब्रिगेडीयर सुनिल गावपांडे सेवानिवृत्त यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. रक्षणम डिफेन्स प्रेपरेटोरी रक्षा मंत्रालय चे लाईफ स्किल्स फाऊंडेशनचे संस्थापक मा. प्रोफेसर अनिल वानखेडे, डाँ. राजेश्वरी वानखेडे नागपूर, ज्ञानदा वसतीगृहाचे आनंदवन माजी प्राचार्य तथा संस्थापक उपलेंचवार सर, डाँ. सागर वझे, अमन टेमुर्डे , सुरेश बोभाटे माजी सैनिक तथा अध्यक्ष शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना चंद्रपूर, वामन राजूरकर, अशोक वर्मा, ऋषी मडावी माजी सैनिक उपाध्यक्ष- एअर बाँर्न ट्रेनिंग सेंटर वरोरा इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
कार्यक्रमापुर्वी शहिदांना आदरांजली वाहून मानवंदना दिली. या सत्कार सोहळा प्रसंगी डाँ. राजेश्वरी वानखेडे म्हणाल्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा आणि उत्तम चारित्र्य या दोन गोष्टी कडे लक्ष द्यावे. चांगला व्यक्ती बनणे आणि आपला देश, समाज आणि बंधुत्वासाठी काम करणे, असा प्रयत्न करायला हवा असे आवाहन त्यांनी केले. कारगिल युध्द लढणारे जवान हे वयाने अत्यंत लहान आणि तुमच्या माझ्यासारखे सामान्य घरातील होते. मात्र शौर्य, बलिदान, निष्ठा, परिश्रम आणि शिस्तीच्या आधारे त्यांनी देशाला गौरव वाटेल असे कार्य केले. यावेळी विविध शाळेतील मुलांनी देशभक्तीपर गाण्यावर अप्रतिम साहस नृत्ये सादर केलीत. कार्यक्रमाला सशस्त्र सेनाचे माजी अधिकारी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, सैनिक स्कुलचे पदाधिकारी, विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.