Home Breaking News Bhadrawati taluka@news • विद्यार्थ्यांनो आत्मविश्वास बळकट करा:राजू गैनवार

Bhadrawati taluka@news • विद्यार्थ्यांनो आत्मविश्वास बळकट करा:राजू गैनवार

248

Bhadrawati taluka@news
• विद्यार्थ्यांनो आत्मविश्वास बळकट करा:राजू गैनवार

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती – येथील यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक विद्यालय भंगाराम वॉर्ड भद्रावती तर्फे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना शालेय गणवेश बेल्ट राजू गैनवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू गैनवार, माजी नगरसेवक व शिक्षण समितीचे सदस्य हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून रवी मडावी,मुख्याध्यापक वंदना गैनवार, सामाजिक कार्यकर्ती छगन पराते,शिक्षक पपिया बीश्वास, शिक्षिका संगीता नालमवार, मंचावर मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषण करताना राजू गैनवार म्हणाले की आयुष्यात अडचणी येणे काही नवीन नाही आपण सतत नव नवीन गोष्ट शिकत असतो या वस्तुस्थितीचा परिणाम म्हणून काही अडचणी येत असतात हे विद्यार्थ्यांनाही लागू होते विद्यार्थ्याचे शैक्षणिक जीवन अनेकदा आव्हाने आणि अडचणींनी भरलेले असते सकाळी उठल्यापासून अगदी रात्री झोपेपर्यंत त्यांचा दिनक्रम ठरलेला असतो. शैक्षणिक संस्थेत विद्यार्थी हा शिकण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा समूह असतो शिक्षण घेण्याच्या ध्येयाने विद्यार्थी एकत्र येतात परिणामी ते पदवी प्राप्त करून नोकरी व व्यवसाय पात्र ठरतात आव्हाने हे जीवनाचा अविभाज्य भाग आहे विद्यार्थ्यां समोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे यशस्वी वेळ – व्यवस्थापन हे कौशल्य आत्मसात करणे.
महाविद्यालयीन जीवनात चांगले समायोजन करणे जर ही आव्हाने वेळेत हातळली गेली नाही तर ती एखाद्याच्या जीवनात दीर्घकालीन अडथळे निर्माण करू शकतात म्हणून या अडचणीचा सामना कसा करायचा हे शिकणे महत्वाचे आहे.
विद्यार्थांना शिक्षण योजनेतून विविध उपक्रम येत असतात माध्यान्य भोजन – शालेय पोषण आहार. बुक. पुस्तक वाटप करण्यात येत असतो असे ते म्हणाले
विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.