Home Breaking News Bhadrawati taluka@news • विवेकानंद महाविद्यालयात संस्थापक मोरेश्वर टेमुर्डे यांची जयंती साजरी

Bhadrawati taluka@news • विवेकानंद महाविद्यालयात संस्थापक मोरेश्वर टेमुर्डे यांची जयंती साजरी

66

Bhadrawati taluka@news
• विवेकानंद महाविद्यालयात संस्थापक मोरेश्वर टेमुर्डे यांची जयंती साजरी

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती : “जयंतीच्या निमित्ताने महापुरुषांचे चांगले विचार ऐकून काही जीवनात अंगीकारता येऊ शकतात. त्यातून प्रेरणा मिळून आत्मविश्वास वाढतो आणि माणसाची प्रगती होते” असे विचार भद्रावती शहरातील प्रयोगशील विचारवंत गिरीश पद्मावार यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात संस्थापक ॲड .मोरेश्वर टेमुर्डे यांच्या जयंती निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा या शैक्षणिक संस्थेचे सचिव अमन टेमुर्डे होते.
यावेळी मंचावर लोकसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष बळवंतदादा गुंडावार, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. धनराज अस्वले, विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा च्या सदस्य मायाताई राजुरकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय टेमुर्डे यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. या निमित्ताने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण, वार्षिकांक विवेक चे प्रकाशन व सौर ऊर्जा लॅबचे उद्घाटन यासह अनेक उपक्रम राबवण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. ज्योति राखुंडे, प्रास्ताविक प्राचार्य डॉ नामदेव उमाटे, आभारप्रदर्शन कार्यक्रमाचे समन्वयक प्रा अमोल ठाकरे यांनी केले. यावेळी कार्यक्रमास भद्रावती शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी याची मोठ्या संख्येने उपस्थित होती.