Home Breaking News Varora taluka@ news • “त्या”अल्पवयीन मुलीकडून शरीर विक्रीचा व्यवसाय करून घेणाऱ्या टोळीला...

Varora taluka@ news • “त्या”अल्पवयीन मुलीकडून शरीर विक्रीचा व्यवसाय करून घेणाऱ्या टोळीला केले पोलिसांनी जेरबंद! •11 आरोपीं पोलिसांच्या ताब्यात • पोलिस पथक करीत आहे या घटनेची सखोल चौकशी !

2780

Varora taluka@ news
• “त्या”अल्पवयीन मुलीकडून शरीर विक्रीचा व्यवसाय करून घेणाऱ्या टोळीला केले पोलिसांनी जेरबंद!
•11 आरोपीं पोलिसांच्या ताब्यात
• पोलिस पथक करीत आहे या घटनेची सखोल चौकशी !

✍️ खेमचंद नेरकर
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी,वरोरा

चंद्रपूर :एका गरीब कुटुंबातील अल्पवयीन १४ वर्षाच्या मुलीला पैशाचे आमिष देऊन त्या मुलीला आमचेसोबत राहा,तुला खाणे -पिणे व्यवस्थित राहील.असे सांगून एका 22 वर्षाच्या महिलेने आपल्या सोबत ठेऊन वरोरा-भद्रावती याठिकाणी देहव्यापार सुरू केला.ग्राहकाकडून ५०० रुपये प्रमाणे घेऊन अल्पवयीन मुलीसोबत देहव्यापार सुरू होता.
मुलीला विश्वासात घेऊन एक-एक करीत तिच्यासोबत सेक्स सुरू असायचा ,हा प्रकार गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सतत सुरू होता.परंतु आता पावेतो कोणाच्या ही लक्षात आले नव्हते.एक अल्पवयीन मुलगी,एक २२वर्षीय महिला व ९ सेक्सचा आनंद लुटणारे ग्राहक असे एकुण ११ आरोपी असल्याचे बोलल्या जात आहे.सर्व आरोपी वरोऱ्यातील मूळ रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु या प्रकरणातील एक आरोपी एका गुन्ह्यात कारागृहात असल्यामुळे १०आरोपींना वरोरा पोलिसांनी अटक केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सदरहु कारवाई दि.४ऑगस्टला करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या देहव्यापार बाबत तपास सुरू होता.दोन एजंट आणि नऊ वेगवेगळे ग्राहक असून दोन-तीन ग्राहक मिळून अत्याचार करीत होते.सदरहु देहव्यापारचा प्रकार दोन ते तीन महिन्यापासून सुरू होता.फोन काल डिटेल्स मधून हे सर्व निष्पन्न झाले आहे.या देहव्यापारामध्ये पुन्हा काही ५ ते१० आरोपी सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.न्यायालयाकडून पंचनामा झाल्यानंतर आरोपींची ओळख होईल.अल्पवयीन मुलगी सेक्स ऍक्ट नुसार २२६/२३ अन्वये ,देहव्यापार ऍक्ट नुसार पास्को, पिटाचा गुन्हा दाखल केला आहे.
असे सहा.पोलीस अधीक्षक,पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांनी पोलीस स्टेशन मध्ये झालेल्या एका पत्रपरिषदेत सांगितले .

देहव्यापाराबाबत अधिकची माहिती समोर यावी किंवा पुन्हा काही ग्राहक यामध्ये गुंतले आहे का?याबाबत तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक परदेशी यांनी एसआयटी कमिटी बनविली असून या कमिटी मध्ये सहा.पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा आयुष नोपाणी,पोलीस निरीक्षक अमोल काचोरे,दोन महिला पोलीस अधिकारी,सायबर रायटर एकूण आठ लोकांची एसआयटी कमिटी बनविली आहे.

देहव्यापार वरोरा -भद्रावती मध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असावा असे सदरहु उघडकीस आलेल्या प्रकारावरून लक्षात येत आहे.त्याज्ञदिशेने कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्र फिरत असून देहव्यापारामध्ये गुंतलेले मोठे मासे जाळ्यात अडकण्याची दाट श्यक्यता वर्तविली जात आहे.