Home Breaking News • महिलांनी घेतली दिल्लीला खा.अगाथा संगमा यांची भेट!

• महिलांनी घेतली दिल्लीला खा.अगाथा संगमा यांची भेट!

192

• महिलांनी घेतली दिल्लीला खा.अगाथा संगमा यांची भेट!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

मणिपूरला हजारोंच्या संख्येंने असलेल्या झुंडीने कुकी आदिवासी समाजाच्या महिलांना विवस्त्र करून त्यांची नग्न धिंड काढण्यात आली .अशाप्रकारे एक विडीओ सोशल मीडिया वर आल्यामुळे या मणिपूरच्या घटनेने देश पूर्णता हादरून गेला.त्याचे तीव्र पडसाद देश विदेशात उमटले.यासाठी देशभरातील दलित आदिवासी समाज व गैर आदिवासी इतर सामाजिक कार्यकर्ते सुजाण नागरिकांनी स्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले.
या घटनेची जगभरात निंदा झाली परंतु दुर्दैवाने देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, राष्ट्रपती, महिला बाल कल्याण मंत्री काहीच बोलत नाही.एवढा भयंकर हिंसाचार होऊन देखील मणिपूरचे मुख्यमंत्री सुध्दा कायदा सुव्यवस्था राखु शकले नाही.स्थानिक एल टी एल एफ संस्थेच्या अहवालानुसार 41425 विस्थापित झाले.मृत्यूसंख्या 121 दर्शवते.197 गांव जाळले गेले.यात 7 हजार घरे जाळण्यात आले.359 चर्च व क्वार्टर्स जाळले .शवांची विल्हेवाट क्रूरपणे लावली.अजुनही अशा घटना थांबत नाही या भयंकर स्थितीला आटोक्यात आणण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे.
म्हणुन गडचिरोली येथील सुप्रसिद्ध आदिवासी साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ता कुसुम ताई अलाम,ममता कुजूर सामाजिक कार्यकर्ता छत्तीसगड,डॉ वासवी किडो झारखंड, यांनी कुकी आदिवासी महिलांना सोबत घेऊन दिल्ली येथे खासदार अगाथा संगमा यांची भेट घेतली.मणिपूरची स्थिती त्यांना अवगत करून दिली.पिडीतांची नुकसान भरपाई, साक्षीदारांचे संरक्षण,मदत शिबिरातील असुविधा दूर करणे, मुलांच्या पुर्ववत शिक्षणासाठी मदत उपलब्ध करून देणे,तसेच शासनाच्या मार्फत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी त्यांनी या भेटी दरम्यान केली असल्याचे कुसुम ताई अलाम यांनी या प्रतिनिधीशी बोलताना आज सांगितले.