Home Breaking News Chandrapur city@ news • अतिरिक्त शुल्क मागे घ्या अन्यथा महावितरणच्या कार्यालयाला टाळे...

Chandrapur city@ news • अतिरिक्त शुल्क मागे घ्या अन्यथा महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू राजू झोडेंनी दिला इशारा

75

Chandrapur city@ news
• अतिरिक्त शुल्क मागे घ्या अन्यथा महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू राजू झोडेंनी दिला इशारा

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:महागाईने वैतागलेल्या सर्वसामान्य जनतेचा उरलासुरला खिसाही पुरता साफ करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने वीज दरवाढ व अतिरिक्त शुल्क लावल्याने जणू शॉकच सामान्य जनतेला देण्याचे ठरवले आहे कि काय? असा सवाल उपस्थित करत वीज बिलावर लावलेले अतिरिक्त शुल्क मागे घ्या अन्यथा चंद्रपुर वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकू असा गंभीर इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी आज महावितरण कंपनीला दिला आहे.

इंधन समायोजन आकार व विविध कर वसुलीच्या नावाखाली परवानगी आणि त्यातही सर्वच वीज कंपन्यांनी दरवाढ करून सर्वसामान्य नागरिक, शेतमजूर, उद्योजक यांना दर महिन्याला २००-३०० रुपयांचा शॉक सरकारने दिला आहे. एकीकडे देशात दिल्ली व पंजाब राज्यात नागरिकांना २०० ते ३०० युनिट वीज मोफत दिली जाते. तेच आपल्या महाराष्ट्रात का घडू शकत नाही? असा प्रश्न सुध्दा राजू झोडे यांनी केला आहे.

वीज महामंडळावरील कर्जाचा डोंगर सामान्य माणसामुळे झालेला नाही. त्यास महामंडळाची यंत्रणाच पूर्णता जबाबदार आहे. जर विजेची चोरी व गळती कागदोपत्री घोडे न नाचवता नियंत्रणात आणली तर सहज नागरिकांनाही दिल्ली, पंजाबप्रमाणे दिलासा मिळू शकतो, पण सरकार तसे विचार करू शकत नसून सर्वसामान्य नागरिकांचा गळा घोटण्याचे काम सरकार करत आहे.त्यामुळं वीज बिलावर लावलेले अतिरिक्त शुल्क मागे घ्या, वीज बिल कमी करा अन्यथा महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे.