Chandrapur city@ news
• चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात न्यूरोलॉजी विभाग सुरू करा आपच्या अधिवक्ता सुनीता पाटील यांची मागणी
✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
चंद्रपूर:चंद्रपूर शहर लगत विविध इंडस्ट्रीज, फॅक्टरी, कोळसा खदान, पावर प्लांट गेल्या काही वर्षांपासून सुरु आहेत. येथील वाहतूक वर्दळ ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण या शहरात वाढलेले आहे. नैसर्गिक आपत्ती मुळे देखील जीवित हानी होण्याची शक्यता असते, कोणताही अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यास डोक्याला मार लागण्याची भीती जास्तीत जास्त असते .चंद्रपूर शहरात सरकारी दवाखाना आहे. परंतु त्या रुग्णालयात न्यूरोलॉजीचा विभागच उपलब्ध नाही .अपघातात जर डोक्याला मार लागला तर सरळ नागपूरला जावे लागते. ही परिस्थिती आहे.अशा वेळेस रुग्णांचे प्राण वाचण्याची शक्यता फार कमी असते.नुकतेच आम आदमी पार्टीच्या महिलाध्यक्ष ऍडवोकेट सुनीता पाटील, महिला उपाध्यक्ष जास्मिन शेख, महिला उपाध्यक्ष रूपाताई काटकर, या शिवाय सुहास रामटेके, संतोष यादव, तब्बसुम शेख, पुष्पाताई बुधवारे, विद्या मोहुर्ले,ज्योती तोडासे यांनी मेडिकल कॉलेजचे डीन यांना एक लेखी निवेदन दिले .न्यूरोलॉजी विभाग चंद्रपूरच्या रुग्णालयात तात्काळ सुरू करावा अशी त्यांनी मागणी या निवेदनातून केली आहे.
