Home Breaking News Varora taluka@ news ……………..अन् तिने भर पोलिस स्टेशन मध्येच विष प्राशन केले...

Varora taluka@ news ……………..अन् तिने भर पोलिस स्टेशन मध्येच विष प्राशन केले वरोरा येथील घटना; महिलेला उपचारार्थ चंद्रपूर रुग्णालयात हलविले !

118

Varora taluka@ news
……………..अन् तिने भर पोलिस स्टेशन मध्येच विष प्राशन केले
वरोरा येथील घटना; महिलेला उपचारार्थ चंद्रपूर रुग्णालयात हलविले !

✍️ खेमचंद नेरकर
सुवर्ण भारत: वरोरा तालुका प्रतिनिधी

वरोरा:एका विवाहित आदिवासी महिलेने काही दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेऊन तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचून न्यायाची अपेक्षा केली होती .पण सदरहू प्रकरणात पोलिस आरोपींना अट्रॉसिटी ऍक्टनुसार अटक करीत नसल्याचा आरोप लावून तिने सोमवार दि. ७ ऑगस्टला चंद्रपूर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात विष प्राशन करण्याचा इशारा दिला होता.
सदरहु आदिवासी महिलेच्या इशाऱ्याला गांभीर्याने घेऊन पोलिसांनी संबंधित आरोपी रिझवान शेख (वय ३२ वर्षे ), दानिश शेख (वय २७ वर्षे ) व मोहसीन शेख (वय २४ वर्षे ) यांना अटक केली होती. अन्य एक आरोपी मोहम्मद शेख (वय ६२वर्षे ) याला प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे पोलिसांनी अटक केली नव्हती. सदरहु आदिवासी महिलेच्या मागणीची पूर्तता झाल्यानंतर पोलिसांनी तिला सोमवारी दुपारी १२.०० वाजताच्या सुमारास वरोरा पोलीस स्टेशनला बोलावून घेतले होते. यावेळी चंद्रपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक, वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी व २ महिला अधिकारी यांच्यावतीने संबंधित महिलेचे समुपदेशनही सुरू होते. “आरोपींना ६ महिने जामीन मिळणार नाही याची गॅरंटी द्या ” , या मागणीवर ती अडून बसली होती. तिच्या मागणी व कायद्यानुसार सर्व कार्यवाही झाली असल्याचे तिला पोलिसांकडून सांगितले गेले. याच दरम्यान दुपारी ३.४५ वाजताच्या दरम्यान सदरहु महिलेने पाणी पिण्याच्या निमित्ताने सोबत आणलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीतून पाणी प्याल्यानंतर तिची तब्येत अचानक बिघडल्याने तिने विष प्राशन केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

पोलिसांनी तिला तात्काळ वरोरा उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. तिथे प्रथमोपचार झाल्यानंतर सदरहु महिलेला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. ही सर्व घटना पोलीस स्टेशनमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्‍यात कैद झाली आहे. या प्रकरणात महिलेच्या मागणीनुसार व कायद्यानुसार आवश्यक कारवाई झाली आहे. पुढील कार्यवाहीसुद्धा कायद्यानुसार होणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी (भा.पो.से.) यांनी पोलीस स्टेशन परिसरात आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.
या घटनेने चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.