Home Breaking News Bhadrawati taluka@news • विद्यार्थ्यांना व पालकांना बुद्धीबळ प्रशिक्षण घेऊन नियमित...

Bhadrawati taluka@news • विद्यार्थ्यांना व पालकांना बुद्धीबळ प्रशिक्षण घेऊन नियमित खेळणे अतिशय आवश्यक आहे:आर के चौधरी

135

Bhadrawati taluka@news
• विद्यार्थ्यांना व पालकांना बुद्धीबळ प्रशिक्षण घेऊन नियमित खेळणे अतिशय आवश्यक आहे:आर के चौधरी

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती – अमेचुर चेस असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट आणि आयुध मल्टिपरपज अमेचुर स्पोर्ट्स अकादमी, अंकुर विद्या मंदीर स्कूल, आयुध निर्माणी चांदा यांच्या संयुक्त विधमानाने जिल्हा असोसिएशनचे संस्थापक व सेक्रेटरी रेंशी दुर्गराज एन रामटेके यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय बुद्धीबळ ट्रेंनिग कॅम्प चे आयोजन दिनांक 06 ऑगस्ट 2023 ला ओ एफ क्लब सभागृह, दिवाळी मेळा ग्राउंड, आयुध निर्माणी चांदा वसाहत येथे करण्यात आले होते.

या बुद्धीबळ कॅम्प चे शुभारंभ आयुध निर्माणी चांदा चे उपमहाप्रबंधक आर के चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी मंचावर अमेचुर चेस असोसिएशनचे संस्थापक प्रमुख व कोषाध्यक्ष प्रोफेसर दुष्यांत नगराळे सर, इंटरनॅशनल रेटेड चेस प्लेयर आणि स्टेट आरबीटर सुरज जयस्वाल ( सहसचिव – अमेचुर चेस असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट ), आयुध स्पोर्ट्स अकादमी के कोच श्रीहरी गसकांटी सर, राजुरा तालुका सचिव बंडू करमनकर , कोरपना तालुका सचिव संदीप पंधरे सर प्रामुख्याने उपस्थित होते.

या कॅम्प दरम्यान भद्रावती तालुक्यातील च नव्हे तर चंद्रपुर जिल्ह्यातील अथलेटिकस क्रीडा प्रकारात स्पोर्ट्स अथोरिटी ऑफ इंडिया द्वारा सिक्स वीक सर्टिफिकेट कोर्स NIS बंगलोर वरून पुर्ण करणारे खेळाडू श्रीहरी गसकांटी यांचा जाहीर सत्कार आर के चौधरी सर यांच्या हस्ते करण्यात आला.
जवळपास 03 तास चाललेल्या या कॅम्प मध्ये बुद्धीबळ खेळाचे बेसिक प्रशिक्षण व स्पर्धा पुर्व प्रशिक्षण देण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर गोटमारे ( वरीष्ठ चेस खेळाडू तथा ज्युनिअर वर्क्स मॅनेजर, आयुध निर्माणी चांदा ) व मान. मुख्याध्यापक मिलिंद वाघमारे सर ( सिनिअर चेस प्लेयर तथा सहसचिव – अमेचुर चेस असोसिएशन ऑफ भद्रावती तालुका ) हे प्रामुख्याने उपस्थित होते.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गौतम भगत, अंकुश भोयर, प्रल्हाद राऊत, राजेश खोब्रागडे, अनंत मंडल, विनोद गायकवाड, संजय सिंग, जितु सिंग, सुमंत सिंग , पांडुरंग भोयर, दीक्षांत रामटेके, क्रिश भोसकर, अंश क्षीरसागर , शौर्या रामटेके, दिव्या गेडाम ,यांनी प्रयास केला.