Home Breaking News Bhadrawati taluka@news • आदिवासी दिनानिमित्त प्रांजली तिराणिक ने रेखाटले क्रांतिकारकांचे चित्र...

Bhadrawati taluka@news • आदिवासी दिनानिमित्त प्रांजली तिराणिक ने रेखाटले क्रांतिकारकांचे चित्र • रेखाचित्रातून आदिवासींची अस्मिता जागर करण्याचा आगळा-वेगळा उपक्रम

42

Bhadrawati taluka@news
• आदिवासी दिनानिमित्त प्रांजली तिराणिक ने रेखाटले क्रांतिकारकांचे चित्र

• रेखाचित्रातून आदिवासींची अस्मिता जागर करण्याचा आगळा-वेगळा उपक्रम

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत:भद्रावती तालुका प्रतिनिधी

भद्रावती: ९ आँगष्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून जगभरातील आदिवासी बांधव खेड्यापाड्यात मोठ्या उत्साहाने साजरा करतात, संयुक्त राष्ट्र संघटनेने हा दिवस जागतिक आदिवासी दिवस घोषित केल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनन्य साधारण असे आहे.
आदिवासी समुदायाच्या मानवी अधिकाराचे सरंक्षण व्हावे, त्यांचा जल – जंगल व जमिनीवरील अधिकार अबाधित राहावा. त्यांची विशिष्ट संस्कृती, ओळख, अस्तित्व, आत्मसन्मान, अस्मिता कायम राहावी यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रयत्नांची आवश्यकता लक्षात घेऊन हा दिवस साजरा करण्यात येतो. दरम्यान, या दिनाचे औचित्य साधून प्रांजली परमानंद तिराणिक या बालचित्रकर्तीने क्रांतीकारकांची रेखाचित्रे साकारली आहे.

ज्या क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरुद्ध लढताना आदिवासींनी शंभरपेक्षाही अधिक लहान मोठे सशस्त्र संघर्ष केला. या संघर्षामध्ये अनेक आदिवासी वीर हुतात्मा झाले. इ.स. १७८५ ला बिहारमध्ये तिलका मांझी हा ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करून फासावर गेला. तेव्हापासून आदिवासींच्या लढ्याचा धगधगता इतिहास सुरू आहे.

१४५० पासुन तर स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत निरनिराळ्या प्रदेशातील आदिवासी विरांनी स्वातंत्र्यासाठी उठाव, चळवळी केल्या, ब्रिटिशांशी संघर्ष केले. त्यात भगवान बिरसा मुंडा हे वगळता ईतर आदिवासी क्रांतीकारकांची फारशी दखल अजुनही इतिहासात नाही. राँबीनहुड शामा दादा कोलाम, बाबुराव पुलेश्वर शेडमाके, तंट्याभिल्ल, राघोजी भांगरे, नारायणसिंह ऊईके, राणी दुर्गावती यासारखे असे शेकडो क्रांतीकारकांची माहिती अभ्यासामध्ये आलेली नाही म्हणून भारताच्या निरनिराळ्या भागांत इंग्रजाविरूध्द झालेल्या लढ्यात योगदान तेवढेच महत्वपुर्ण राहिले त्यामुळे या क्रांतीकारकांना रेखाचित्रातून आदरांजली वाहून प्रांजली परमानंद तिराणिक या मुलीने या दिनानिमित्त रेखाचित्र साकारून चित्रातून आदिवासींची अस्मिता जागर करण्याचा आगळा वेगळा उपक्रम राबवित आहे.