Home Breaking News Vani taluka@ news • मारेगावात सादर झाले ‘द ब्रेड ऑफ लाईफ’ नाट्य...

Vani taluka@ news • मारेगावात सादर झाले ‘द ब्रेड ऑफ लाईफ’ नाट्य प्रयोगाचे सादरीकरण !

124

Vani taluka@ news
• मारेगावात सादर झाले ‘द ब्रेड ऑफ लाईफ’ नाट्य प्रयोगाचे सादरीकरण !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

मारेगाव (वणी):’आझादी का अमृत महोत्सवा’ अंतर्गत’ केंद्र सरकार व सांस्कृतिक विभाग, नवी दिल्ली आयोजित ‘मेराकी’ परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गनायझेशन, नागपूर यांनी मंगला सानप (राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली) दिग्दर्शीत ‘द ब्रेड ऑफ लाईफ : डॉ. पांडुरंग खानखोजे, द अनसंग हिरो’या नाटकाचे आज शुक्रवार, दिनांक 11 ऑगस्टला सकाळी 11:30वाजता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगाव(वणी )येथे सुरेखरित्या सादरीकरण करण्यात आले.

वर्धा जिल्ह्यातील क्रांतिकारी कृषी शास्त्रज्ञ पांडुरंग खानखोजे यांचे भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात सर्वात मोलाचे योगदान आहे, त्यांचे कृषी क्षेत्रातील कार्य अनमोल आहे, तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भारताल्याच नव्हे तर परदेशातल्या भारतीय लोकांची देशासाठी मदत आणण्याची महत्वाची भूमिका बजावली. ‘द ब्रेड ऑफ लाईफ डॉ. खानखोजे ‘द अनसंग हिरो’ हे नाटक त्यांच्या जीवनावर आधारित आहे.

या प्रयोगामुळे आम्हाला अपरिचित क्रांतिकारक डॉ.खानखोजें बद्दल माहिती मिळाली’अशा अनेक प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून ऐकायवास मिळत आहे .
या नाटकात कलावंतांच्या भूमिकेत पुष्पक भट, स्नेहा खंडारे, ट्विंकल मोटघरे, हर्षवर्धन देशमुख, कृष्णा लाटा, ऋतुराज वानखेड़े, शुभम गौतम, स्नेहा खंडारे, ट्विंकल मोटघरे, अविनाश अरोरा, कुणाल टोंगे, कुणाल मेश्राम, सिद्धांत पटेल, चैतन्य दुबे, अनुक्षा आर्गे, महक त्रिपाठी, निश्चय बेलानी, बुद्धांश, शुभम शेंडे, मयूर मानकर, अंकित ठाकरे यांची महत्त्वाची भूमिका होती .सदरहु प्रयोगासाठी प्रकाश योजना अक्षय खोब्रागडे, संगीत संयोजन नारायण, संगीत संचालन निकीता ढाकुलकर,
रंगभूषा व वेशभूषा ऋतुजा वानखेडे, प्रबंध व समन्वयन हितेश यादव यांचे होते तर कला सहायक रितेश, सिनोग्राफी अलियर व सिनोग्राफी सहाय्य अंकित ठाकरे यांचे लाभले आहे.

नितीन गडकरी यांच्यामुळेच आज डॉ .खानखोजे लोकांपर्यंत पोहोचत आहेत.

या कार्यक्रमासाठी सुनील खानखोजे, ज्योती खानखोजे, सावित्री सावनी,अजेय गंपावार, मनोज मोहिते यांचे विशेष सहकार्य लाभले. व्यवस्थापन हितेश यादव तर प्रसिद्धी व्यवस्थापन अश्लेष जामरे,अभिजीत आठवले, अभिषेक सिंग यांनी सांभाळले आहे.नाट्य सादरीकरणास प्रमुख पाहुणे म्हणून जीवन कापसे,अधिवक्ता भास्कर ढवस यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती. डॉ .अविनाश घरडे, प्रा.अक्षय जेनेकर यांचे स्थानीय सहाय्य लाभले.