Ballarpur city@ news
•बल्लारपूर नगर परिषद मार्फत
•स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत बल्लारपूर शहरामध्ये “मेरी माटी, मेरा देश ” अभियानांतर्गत कार्यक्रम
सुवर्ण भारत:शंकर महाकाली(उपसंपादक)
बल्लारपूर :- केंद्र शासनाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी माटी, मेरा देश” अर्थात “माझी माती, माझा देश” हा अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक राज्यात गाव ते शहरांपर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शुरविरांचा सन्मान व्हावा याकरीता राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने बल्लारपूर नगर परिषदेने दिनांक १३/०८/२०२३ रोजी रविवारला “मेरी माटी, मेरा देश” अंतर्गत कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.
त्यात सकाळी ०९.०० वाजता झेंडा वंदन गणपती घाट, बल्लारपूर सकाळी ०९.३० वाजता अमृत वाटीका ७५ रोपांचे लागवड, सेवासिंग पेट्रोल पंप जवळ, शिवाजी वार्ड, बल्लारपूर, सकाळी १०.०० वाजता शिल अनावरण विवेकानंद नगर वार्ड, काटा गेट चौक, सकाळी १०.३० वाजता स्वातंत्र्य, आजी-माजी सैनिक यांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रम नाट्यगृह, बल्लारपूर.
बल्लारपूर नगर परिषदेकडून अमृत महोत्सव कार्यक्रम शहरात विविध ठिकाणी राबविण्याचे ठरविण्यात आलेले असल्यामुळे नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन महोत्सवाची शोभा वाढवावी असे प्रशासक तथा मुख्याधिकारी, श्री. विशाल वाघ यांनी नागरीकांना आवाहन केलेले आहे.