Home Breaking News Ghugus city @news • घुग्घुस शहरात ७५ फुट उंचीच्या तिरंगा झेंड्याचे लोकार्पण...

Ghugus city @news • घुग्घुस शहरात ७५ फुट उंचीच्या तिरंगा झेंड्याचे लोकार्पण आमदार किशोर जोरगेवार केले

359

Ghugus city @news
• घुग्घुस शहरात ७५ फुट उंचीच्या तिरंगा झेंड्याचे लोकार्पण आमदार किशोर जोरगेवार केले

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधि, चंद्रपूर

घुग्घुस: येथील दि.१३ ऑगस्ट २०२३ रविवार रोजी आ.निधीतून स्थानिक आ.किशोर जोरगेवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन बस्थानक परिसरात स्वातंत्र्य अमृत महोत्सव ७५ फूट उंचिचा तिरंगा झेंडा उभारण्यात आला.

यावेळी बोलताना आ.किशोर जोरगेवार म्हणाले कि, तिरंगा हा देशाची शान आहे. ऊर्जेचा स्त्रोत आहे. संपुर्ण देश वासियांना तिरंगा प्रती आदर आहे. त्यामुळे केद्र सरकारने हर घर तिरंगा हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला चंद्रपूरातही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमा अंतर्गत महानगर पालिकेच्या वतीने तिरंगा वितरीत केल्या जाणार आहे.
नागरिकांनी तो आपल्या घरी लावाला असे आवाहण यावेळी त्यांनी केले. राज्यातील प्रत्येक तालुक्यात 75 ते 100 फुट उंचीचा राष्ट्रध्वज फडकविण्यात यावा अशी भुमिका राज्य सरकारची होती. आपणही यासाठी आपल्या विधानसभा क्षेत्रात येणा-या घुग्घुस आणि चंद्रपूर येथे सदर उंचीचा राष्ट्रध्वज कायमस्वरूपी लहरत राहावा याकरिता निधी उपलब्ध करून दिला होता. याचे काम पुर्ण झाले आहे. आज याचे लोकार्पण पार पडले.

यावेळी घुग्घूसचे पोलिस निरीक्षक आसिफ शेख, सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष मधुकर मालेकर,काॅंग्रेस घुग्घूस शहर अध्यक्ष राजू रेड्डी,घुग्घुस आम आदमी पक्षाचे अमित बोरकर,घुग्घुस शिवसेनाप्रमुख चेतन (बंटी)घोरपडे,काँग्रेस नेते शेखर तंगडपेल्ली,श्रीनू गुडला, यंग चांदा ब्रिगेडचे इमरान शेख,बहुजन समाज आघाडी शहर अध्यक्षा सौ.उषाताई गौतम आगदारी,सौ.वनिता निहाल मुन्ना लोढे, नविन मोरे आदींची परिसरातील बरेच पक्षाचे कार्यकते,नागरीक उपस्थित होते.