Home Breaking News Gondpipri taluka@ news •अवैध दारु विक्री विरोधात महिलांनी कंबर कसली •कोटनाकेंच्या...

Gondpipri taluka@ news •अवैध दारु विक्री विरोधात महिलांनी कंबर कसली •कोटनाकेंच्या घरातच पकडली महिलांनी अवैध दारु ! •गोजोलीतील दारु बंद करा महिलांनी केली वरिष्ठांकडे मागणी!

48

Gondpipri taluka@ news
•अवैध दारु विक्री विरोधात महिलांनी कंबर कसली
•कोटनाकेंच्या घरातच पकडली महिलांनी अवैध दारु !
•गोजोलीतील दारु बंद करा महिलांनी केली वरिष्ठांकडे मागणी!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर: जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील धाबा उप- पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोजोली येथे मागील अनेक वर्षांपासून सर्रास अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू होता. याचा नाहक त्रास येथील महिलांना सोसावा लागत असे. एव्हढेच नाही तर गावातील तरुण मुले पूर्णता दारुच्या आहारी गेली होती. यामुळे गावातील त्रस्त महिला एकत्रित येत त्यांनी ह्या अवैद्य धंद्यावर आळा घालण्यासाठी पुढे पाऊल टाकले. 15 ऑगस्ट रोजी रात्री अंदाजे दहा वाजताच्या दरम्यान अवैध दारु विक्री करणाऱ्या रघुनाथ कोटणाके यांच्या घरातून अवैधरीत्या विक्री साठी ठेवलेले दारूचे जवळपास 100 नग पकडले.व त्यांनी थेट उप पोलीस स्टेशन धाबा येथे फोन केला. माहिती मिळताच ठाणेदारासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. संतोष तुमराम रा.चंद्रपूर व रघुनाथ कोटनाके रा.गोजोली या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.पोलिसांच्या समोर गांव महिलांनी या अवैध दारू विक्री मुळे होणारी कुटुंबाची वाताहत कथन करीत गोजोली गावातील अवैध दारू विक्री कायमची बंद करण्याची मागणी या वेळी केली. दरम्यान या बाबतीत त्यांनी वरिष्ठांकडे देखिल सदरहु गावातील कायमची दारुबंदी करण्याची मागणी केल्याचे कळते.ब-याच दिवसांपासून हा दारु विक्रेता गावात दारु विक्री करत असल्याचे गावातील लोकांचे म्हणणे आहे.