Home Breaking News Gadchiroli dist@ news •माजी राज्यमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृवाखाली भारतीय...

Gadchiroli dist@ news •माजी राज्यमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृवाखाली भारतीय जनता पक्षात • सिरोंच्या तालुक्यातील अनेक गावातील शेकडो युवानी केला पक्ष प्रवेश •आणि त्या युवा कार्यकर्ते यांनी घेतली शपथ

75

Gadchiroli dist@ news
•माजी राज्यमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृवाखाली भारतीय जनता पक्षात
• सिरोंच्या तालुक्यातील अनेक गावातील शेकडो युवानी केला पक्ष प्रवेश
•आणि त्या युवा कार्यकर्ते यांनी घेतली शपथ

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

गडचिरोली: जिल्ह्यातील स्थानिक अहेरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या पाचही तालुक्यातील अनेक गावातून मोठ्या संख्येने माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली गावा-गावातून आज युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत,राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांची युवा कर्तृत्ववान शैली, शांत संयमी स्वभाव, विकासाची दूरदृष्टी, विकासात्मक धोरण आणि युवा नेतृत्व गुण हे आजच्या युवा पिढीला आकर्षनाचं केंद्र बिंदू ठरत आहे, काही दिवसांपूर्वी राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे सिरोंच्या तालुका दौऱ्यावर गेले असता तेथील 200 युवा कार्यकर्ते यांनी राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता,
आणि
■15 ऑगस्ट■
स्वातंत्र्यदिनी सिरोंच्या तालुक्यातील अनेक गावातील शेकडो युवा वर्गानी अहेरी येथील रुक्मिणी महल येथे राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांची भेट घेतली आणि राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि
त्या युवकांनी राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या हातात-हात ठेवून
■शपथ घेतली की■
आम्ही आजीवन अहेरी इस्टेट चे राजे आणि माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्यासाठी कार्य करू आणि भारतीय जनता पक्षाचे विकासात्मक धोरण शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करू असे वचन त्यांनी यावेळी दिले आणि घोषणाबाजी केली की,
■राजे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है!■

●गडचिरोली जिल्ह्याची आन-बान-शान◆

★युवा हृदय सम्राट राजे अंम्ब्रिशराव आत्राम★

अशा घोषणेने संपुर्ण वातावरण दुमदुमून गेलं.
त्यावेळी राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांनी सिरोंच्या येथील त्या युवा कार्यकर्ते यांची तालुक्यातील असलेलले प्रश्न,अडचणी आणि स्थानिक समस्या विषयी त्यांच्या सोबत चर्चा केली आणि आपण सदैव सिरोंच्या तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी तत्पर आहो असे आश्वासन दिलं आणि त्या युवा कार्यकर्ते यांच्यासाठी राजे साहेबांनी मेजवानी ची सोय केली आणि त्यांना सामाजिक कार्यासाठी सदैव धडपडत राहा आणि कार्य करत रहा मी आपल्या सोबत सदैव आहो असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.त्यावेळी सिरोंच्या, नगरम, तुमनूर,बोगापूर, अमराजी,आयथेटा, तुरायपल्ली, नारायणपूर, मेळाराम, रामनजेप्पूर,कारसपल्ली, रंगाय्यापल्ली इत्यादी गावातील युवा वर्ग व गावकरी उपस्थित होते.