Home Breaking News Varora taluka@ news • ठक आर्ट गॅलरीतील चित्र प्रदर्शनीला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त...

Varora taluka@ news • ठक आर्ट गॅलरीतील चित्र प्रदर्शनीला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद •चित्रांशी संवाद साधत प्रेक्षकवर्ग झाले कलाकृतीत तल्लीन

571

Varora taluka@ news
• ठक आर्ट गॅलरीतील चित्र प्रदर्शनीला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

•चित्रांशी संवाद साधत प्रेक्षकवर्ग झाले कलाकृतीत तल्लीन

सुवर्ण भारत:खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : येथील नामवंत चित्रकार प्रल्हाद ठक यांनी उभारलेल्या आर्ट गॅलरी मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर स्वरक्ताने काढलेल्या चित्र प्रदर्शनीला तालुकावासीय प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कला शिक्षक प्रल्हाद ठक स्वरक्ताने चित्र बनविण्यासाठी जगात प्रसिद्ध आहेत. त्यांनी सन २०१७ मध्ये स्थापन केलेल्या ‘ ठक आर्ट गॅलरी ‘ मध्ये स्वरक्ताने काढलेली भारतीय क्रांतीकारी, देशभक्त, समाजसुधारक, शास्त्रज्ञ, परमवीर चक्र विजेता आदिंची १५२ चित्रे आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, म. ज्योतिबा, भगतसिंग, सुखदेव राजगुरू, मदनलाल धिंग्रा, मदर तेरेसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, बाबा आमटे, अब्दुल हमीद, विक्रम बत्रा इ.चा समावेश आहे. सोबतच कलादालनात आधुनिक कला, वास्तववादी कला, अमूर्त कला व विविध निवडक चित्रे जनसामान्यांना विनामूल्य पाहण्यासाठी खुली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सकाळी ९.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत खास करून या चित्रांची प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनाला उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी ( भापोसे), तहसीलदार योगेश कौटकर, परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक तथा पो.स्टे. वरोरा प्रभारी अधिकारी योगेश रांजनकर, नायब तहसीलदार मधुकर काळे, भगत, ज्येष्ठ पत्रकार तथा माजी नगरसेवक राजेंद्र मर्दाने, डॉ. प्रशांत खुळे, प्रवीण गंधारे, इंजि. संजीव सक्सेना, मुख्याध्यापक गजानन खोके, महादेव पारखी, इंजि. राऊत, साधना ठक, वरिष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, गणमान्य नागरिक, महिला, शालेय – महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थिनी इ. सह शेकडो रसिक प्रेक्षकांनी भेट देऊन भरभरुन दाद दिली .
चित्रकार प्रल्हाद ठक यांनी स्वरक्ताने काढलेली चित्रे इतकी बोलकी आहेत की, पाहणारे चित्रांशी संवाद साधू लागतात आणि कलाकृतीत तल्लीन होतात. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ९० वर्षीय महिला ज्येष्ठ नागरिक विमलकुमारी सक्सेना प्रदर्शनीला भेट देऊन भावूक झाल्या. त्यांनी प्रदर्शनाची संकल्पना व आयोजकांचे कौतुक केले. आनंद निकेतन महाविद्यालयातील एनसीसीच्या छात्रसैनिकांनी देशभक्तीपर जोशपूर्ण घोषणा दिल्या.
मागील वर्षी शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत कलादालनातील बहुसंख्य अनमोल पेंटींग्ज जळून खाक झाल्या तरीही ठक यांनी हिमंत न हारता दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अत्यंत मेहनतीने पुन्हा गॅलरी सुशोभित केली. यावर्षी आर्ट गॅलरीचे संचालक प्रल्हाद ठक आणि सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र मर्दाने यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रसिक प्रेक्षकांनी शेकडोंच्या संख्येने प्रदर्शनीला भेट देऊन चित्र प्रदर्शनीचे कौतुक केले व त्यातून तरूणांनी प्रेरणाही घेतली.
■आर्ट गॅलरीत नंनीबाई मर्दाने यांची ९१ वी जयंती साजरी■
विविध सामाजिक संघटनेच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक, तत्त्वचिंतक, इतिहास व संत साहित्याचे गाढे अभ्यासक पू. गुरुचरणजी मर्दाने यांच्या धर्मपत्नी सहिष्णुमूर्ती पू. नंनीबाई मर्दाने यांची ९१ वी जयंती येथील ‘ ठक आर्ट गॅलरी ‘ मध्ये साजरी करून दुग्धशर्करा योग साधण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रल्हाद ठक यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. उपस्थित मान्यवरांनीही पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वरोरा अध्यक्ष प्रवीण गंधारे, खेमचंद नेरकर, आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर, राहुल देवडे, विवेक बर्वे, इंजि. रवि चौहान, अरुण विलायतकर, वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने, सहसचिव अशोक बावणे, मयूर दसूडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.