Ballarpur city@ news
• बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या पाणी व सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन लवकरच
• भाजप कामगार मोर्चाला यश मिळाले
सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)
बल्लारपूर :- पालकमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा कामगार मोर्चा प्रदेश सरचिटणीस अजय दुबे यांच्या नेतृत्वाखाली बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या पाणी व सफाई कर्मचार्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न मार्गी लावला आहे. पालकमंत्री यांच्ये विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले यांनी डीआरएम यांच्या सोबत बोलल्यावर त्यांनी पगार देण्याचे सांगितले.
गेल्या अनेक वर्षांपासून बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून येणाऱ्या गाड्यांमध्ये पाणी भरणे व रेल्वे साफसफाईचे काम तात्पुरते कर्मचारी कंत्राटदाराच्या माध्यमातून करत होते. कोविडमध्ये कंत्राटदाराचा ठेका संपल्यानंतर नवीन टेंडर काढण्याऐवजी रेल्वेने थेट त्याच्याकडून काम करून घेण्यास सुरुवात केली.त्यात सुमारे सहा महिन्यांचा पगार थकीत होता.अधिका-यांशी वारंवार संपर्क साधूनही काहीही निष्पन्न न झाल्याने भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अजय दुबे व विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष श्रीकांत उपाध्याय यांच्याशी संपर्क साधला. आज बल्लारशाह रेल्वे स्थानकावर संबंधित अधिकारी जयदेव भोंगाळे यांच्याशी चर्चा करून 18 लाखांची थकबाकी देण्याची विनंती करून हा प्रस्ताव नागपूर मुख्यालयात पाठवून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी भाजप नेते इलियास भाई , शंकर कोमलवार, रोहन करमणकर सागर जुमनाके, सलीम शेख, पुरुषोत्तम दुधे, खुशाल बोरकर आदी प्रमुख उपस्थित होते.