Home Breaking News Chandrapur city@ news • सत्कार समारंभ संपन्न! •मान्यवरांच्या उपस्थितीत झाला भूषण...

Chandrapur city@ news • सत्कार समारंभ संपन्न! •मान्यवरांच्या उपस्थितीत झाला भूषण कारडेंचा सत्कार!

100

Chandrapur city@ news
• सत्कार समारंभ संपन्न!
•मान्यवरांच्या उपस्थितीत झाला भूषण कारडेंचा सत्कार!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:मोरवा येथे
छात्रविर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालयात नुकताच पालक मेळावा व एक सत्कार समारंभ पार पडला .या कार्यक्रमात भूषण विलास कारडे यांची वयाच्या 22 व्या वर्षी PSI पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा या वेळी भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या आरंभी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी PSI भूषण व त्याच्या आई वडिलांचे लेझिम पथकासह रॅली काढून स्वागत केले. सदरहु रॅलीत संस्थेचे पदाधिकारी प्राचार्य, प्राध्यापक सहभागी झाले होते.त्यानंतर महाविद्यालयाच्या सभागृहात पालक सभा व एक सत्कार कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुभाष ठोंबरे होते. तर उद्घाटक म्हणून सचिव शिवाजी धुमणे यांची उपस्थिती लाभली होती.सदरहु कार्यक्रमाला भूषण कारडे, सुधाकर खरवडे, मंदा ठोंबरे, शुभदा धूमने, विलास करडे मीना कारडे आदिं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात भूषण व त्यांच्या आई वडिलांचा सन्मानचिन्ह, शाल व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. कारडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, माझ्या यशात महाविद्यालयातील प्राध्यापक व विविध उपक्रमांचा मोठा वाटा आहे. या शिवाय टेस्ट सिरीज, प्रश्नमंजुषा स्पर्धा, असेम्ब्ली questions स्पर्धा परीक्षा आदिंचा समावेश आहे.महाविद्यालयातील अभ्यासाचे वातावरण व स्वतः केलेल्या अभ्यासाच्या नियोजनावर पहिल्याच प्रयत्नात मला हे यश मिळविण्यात मदत झाली. आत्मविश्वास व अभ्यासातील सातत्य कायम ठेवा. हेच यशाचे मुख्य सूत्र आहे असे भूषण कारडे म्हणाले.

भूषणचे वडील विलास करडे यांनी ही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले . शिवाजी धुमने, सुधाकर खरवडे पालक प्रतिनिधी म्हणून गीता सोनकुसरे सुभाष ठोंबरे यांनीही आपले विचार या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण डॉ .दिलीप चौधरी यांनी केले.तर या कार्यक्रमाचे सुरेख संचालन कु. कोमल बरडे व कु. आचल मशाखेत्री यांनी केले.उपस्थितीतांचे आभार कु. अनघा रामटेके यांनी मानले

कार्यक्रम यशस्वीतेसाठी रासेयो पथक, सांस्कृतिक विभाग, सेमिनार विभाग, व क्रीडा विभागातील कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.