Home Breaking News Gadchiroli dist@ news • आदिवासी साहित्य निर्मिती अत्यंत गरजेची-कुसुम ताई अलाम

Gadchiroli dist@ news • आदिवासी साहित्य निर्मिती अत्यंत गरजेची-कुसुम ताई अलाम

225

Gadchiroli dist@ news
• आदिवासी साहित्य निर्मिती अत्यंत गरजेची-कुसुम ताई अलाम

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

गडचिरोली:आदिवासी महिला समस्या व उपाय या विषयावर रांची (झारखंड )येथे दोन दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. आदिवासी बहुल भागात आदिवासी महिलांच्या शोषणाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.मणिपूरच्या घटनेने देशातल्या आदिवासी भागातील शोषणाचे चित्र स्पष्ट झाले.

आदिवासी भागात खनिज संपत्ती नैसर्गिक साधनसंपत्ती असल्याने ते लुटण्यासाठी विविध कंपन्या आदिवासींवर दबाव व बळाचा गैरवापर करत आहेत.हे माझ्या नऊ राज्यातील महिला व बाल सन्मान यात्रा 2016 च्या दौ-यात दिसून आले होते.तेव्हापासुनच महिला चळवळ उभी करण्याचे काम सुरू केले.आदिवासींचा समृद्ध इतिहास अजुनही लोकांना माहित नाही कारण तो लिहिल्या गेला नाही.

आदिवासी वीरांगना होऊन देखील त्यावर काही बोलले गेले नाही.आर्थिक, सामाजिक,शैक्षणिक,साहित्यिक, देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात संस्कृती भाषा संरक्षणात, कृषी अशा अनेक क्षेत्रात आदिवासी स्त्रीयांचे योगदान आहे.तो इतिहास समजणे व लिहिणे नितांत गरजेचे आहे.यासाठी गडचिरोली जिल्ह्यात पहिले आदिवासी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.साहित्य निर्मितीमुळे स्वअस्तित्व, अस्मिता, स्वाभिमान वाढेल व महिलांमध्ये आत्मविश्वास दृढ होईल.असे कुसुम ताई अलाम ह्या दोन दिवसीय चर्चा सत्रात बोलताना म्हणाल्या.
आदिवासी महिलांची राजकीय स्थिती,घरगुती हिंसाचार, आदिवासी महिला आणि कामगार कायदे, लैंगिक शोषण व न्याय व्यवस्था, संविधान जागरूकता, जमिन स्तरावरील आंदोलन व महिला संघर्ष, आदिवासी महिला व घरगुती कामगार,ट्रान्सजेंडर ,विस्थापनातून निर्माण झालेली समस्या,अशा विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली.यात गिताश्री उरांव माजी शिक्षणमंत्री झारखंड, डॉ वासवी किडो, निर्मला पुतुल संथाली कवयित्री,अगस्तीना सोरेंग संविधान जागरूकता अभियान कार्यकर्ता,क्रिस्ती नाग, लक्ष्मी गोप, पुनम टोप्पो,कुंद्रसी मुंडा, सुनिता लकडा,वसंती सरदार यांनी भाग घेतला.

कार्यक्रमाचे संचालन आलोका कुजुर यांनी केले.मोनिका मरांडी राहुल हेंम्ब्रंम,द्रीप्तराज,तीर्थनाग यांचे विशेष सहकार्य लाभले.या वेळी हिंसाचार पिडीतांनी व सामाजिक कार्यकर्ता महिलांनी आप आपली आपबिती कथन केली .व घरगुती हिंसाचार रिपोर्ट सादर केला.एव्हढेच नाही तर त्यांनी आदिवासी महिलांच्या हक्कासाठी आपला आवाज बुलंद केला.