Home Breaking News प्रख्यात कवयित्री अर्चना सुतार यांना मिळाला “राष्ट्रीय गौरव 2023″चा सन्मान पुरस्कार...

प्रख्यात कवयित्री अर्चना सुतार यांना मिळाला “राष्ट्रीय गौरव 2023″चा सन्मान पुरस्कार ! • अर्पणा चिडे,किरण साळवी, पायल दुपारे ,रश्मी पचारे,प्रिती उमरे,रिना तेलंग, दिक्षा तेली,संगीता पाटील,सरोज हिवरेंसह अनेकांनी केले सुतार यांचे अभिनंदन!

61

• प्रख्यात कवयित्री अर्चना सुतार
यांना मिळाला “राष्ट्रीय गौरव 2023″चा सन्मान पुरस्कार !

• अर्पणा चिडे,किरण साळवी, पायल दुपारे ,रश्मी पचारे,प्रिती उमरे,रिना तेलंग, दिक्षा तेली,संगीता पाटील,सरोज हिवरेंसह अनेकांनी केले सुतार यांचे अभिनंदन!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

सातारा: जिल्ह्यातील पाचवडच्या सुप्रसिद्ध कवयित्री ,लेखिका कु.अर्चना दिलीप सुतार यांना नागपूरच्या एकता फाऊंडेशन सामाजिक संघटन भारत यांच्या कडून नुकताच “राष्ट्रीय गौरव सन्मान 2023″चा पुरस्कार देवून एका भव्य कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले आहे.

कु.सुतार ह्या माध्यमिक शिक्षिका असून आज पर्यंत त्यांचे समाजासाठी फार मोठे योगदान राहिले आहे .त्या स्वरचित कविता व लिखाणातून नित्य समाजकार्य करीत असतात. त्यांनी विविध विषयांवर विपुल प्रमाणात लेखन केले असून ते समाजाला अभिप्रेत आहे. त्यांच्या कोरोना या विषयावरील कवितांची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या शिवाय त्यांना या पूर्वी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांने अनेक वेळा सन्मानित करण्यात आले आहे. अर्चना सुतार ह्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं काव्यकुंजच्या गेल्या अनेक वर्षांपासून सदस्य आहेत.

त्यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या सदस्य अर्पणा चिडे,माया बांगडे, रश्मी पचारे,प्रिती उमरे,साक्षी बद्दलवार, प्रतिभा पोहनकर,सरोज हिवरे ,रिना तेलंग, वर्षा शेंडे,अल्का सदावर्ते,किरण साळवी,दिक्षा तेली , संगिता पाटील ,किर्ती पांडे , प्रतिभा चट्टे,शिल्पा कांबळे ,मंथना नन्नावरे,मनिषा मडावी , नंदिनी लाहोळे,सिमा पाटील, पायल दुपारे ,विजया तत्वादी ,विजया भांगे ,रंज्जू मोडक , वर्षा कोंगरे, कला कोडापे , अर्चना चावरे, स्मिता बांडगे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.