Home Breaking News Bhadrawati taluka@news •डेंगू ची साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा....

Bhadrawati taluka@news •डेंगू ची साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा. •वंचित बहुजन आघाडीचे तालुका वैद्यकीय अधिकारी व् नगराध्यक्ष भद्रावती यांना निवेदन

227

Bhadrawati taluka@news

•डेंगू ची साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा.
•वंचित बहुजन आघाडीचे तालुका वैद्यकीय अधिकारी व् नगराध्यक्ष भद्रावती यांना निवेदन

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत : तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावतीत- वंचित बहुजन आघाडी,भद्रावती च्या वतीने आज दि.23 ऑगस्ट 2023 रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी भद्रावती व् नगराध्यक्ष भद्रावती यांना डेंगू ची साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा,या मागणी चे निवेदन देण्यात आले.

भद्रावती शहरात डेंगू च्या आजाराने पंचशील वार्डातिल एक महिला,तसेच भंगाराम वार्डातील एक महिलेचा मृत्यु झालेला आहे. भंगाराम वार्डा मधे आतापर्यंत 25 ते 30 रुग्ण प्रभावित झालेले आहेत. शहरातील भंगाराम वार्ड,पंचशील वार्ड,डोलारा प्रभाग,तसेच गौतमनगर येथे डेंगू प्रभावित रुग्ण आढळत आहेत.

भद्रावती शहरातील डेंगू ची साथ नियंत्रणात आणण्यासाठी Abate चा छिळकाव करण्यात यावा. आशा वर्कर व् MPW ह्यांना कार्यान्वित करुण त्यांना घरोघरी पाठवून रुग्णांची माहिती घेण्यात यावी. तसेच डेंगू ने प्रभावित परिसरातील रुग्णाची डेंगू RAPIT किट ने तपासणी करण्यात यावी.व् डेंगू ची साथ नियंत्रणात आना अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

तालुका आरोग्य अधिकारी व् नगराध्यक्ष भद्रावती यांना निवेदन देतांना राज्य सदस्य कुशल मेश्राम,जी.उपाध्यक्ष कपुरदास दुपारे,तालुकाध्यक्षा संध्याताई पेटकर,शहराध्यक्षा तथा नगरसेविका राखिताई रामटेके,नगरसेविका सीमाताई ढेंगळे,सुधाकर शंभरकर,डि.एच.रामटेके,जी.जे.रायपुरे,थुलकर साहेब,लताताई टिपले,स्मिताताई इंदुरकर,त्रिशाताई नंदेश्वर,आरतिताई पाटिल,व् सुप्रियाताई चहांदे उपस्थित होते.