Home Breaking News Chandrapur city@ news • दुर्गापूरचा सहाय्यक फौजदार लाचखोर नरेश शेरकी अडकला ५०...

Chandrapur city@ news • दुर्गापूरचा सहाय्यक फौजदार लाचखोर नरेश शेरकी अडकला ५० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात! • पोलिस विभागात उडाली खळबळ

199

Chandrapur city@ news
• दुर्गापूरचा सहाय्यक फौजदार लाचखोर नरेश शेरकी अडकला ५० हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात!
• पोलिस विभागात उडाली खळबळ

सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)

चंद्रपूर:लाच घेणे व देणे हा कायद्याने गुन्हा आहे याची पूरेपूर जाणीव व कल्पना असताना देखील चंद्रपूर लगत असलेल्या दुर्गापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार हे एका प्रकरणात काल शनिवारी रात्री तब्बल ५० हजारांची लाच घेताना चंद्रपूर येथील एसीबी पथकाच्या जाळ्यात अडकल्याची घटना घडली. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. एका घडलेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांच्या मित्राला आरोपी न करण्यासाठी सहाय्यक फौजदार शेरकी यांनी ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्या पैकी काल ५० हजार रुपये घेण्याचे ठरले होते. उर्वरीत २० हजार रुपयांची रक्कम नंतर द्यायची होती.परंतू या बाबतीत तक्रारदारास सदरहु लाच देण्याची मनात मुळीच इच्छा नव्हती. त्याने थेट चंद्रपूरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले व आपली तक्रार नोंदविली.क्षणाचा विलंब न लावता त्या विभागाच्या पथकाने सापळा रचला.त्या सापळ्यात काल दुर्गापूरचा लाचखोर सहाय्यक फौजदार नरेश विठ्ठलराव शेरकी अलगद अडकला.या घटनेचे वृत्त काल दुर्गापूरसह चंद्रपूरात वा-या सारखे पसरताच अनेकांनी या कारवाईचे स्वागत केले.गेल्या काही दिवसांपूर्वी चिमूर तालुक्यातील मंडळ अधिकारी व लाचखोर पटवारी यांना अश्याच एका फेरफार प्रकरणात लाच घेतांना रंगेहात पकडले होते. त्यामुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली होती .

काल दुर्गापूरची कारवाई नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलिस अधिक्षक संजय पुरंदरे ,चंद्रपूर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या उप पोलिस अधिक्षक श्रीमती मंजूषा भोसले ,या विभागाचे कर्मचारी रोशन चांदेकर, संदेश वाघमारे,सतिश शिडाम ,राकेश जांभुळकर, अमोल शिडाम ,रवि ढेंगळे , वैभव गाडगे , मेघा मोहर्ले , पुष्पा काचोळे यांनी यशस्वीपणे केली आहे.