Home Breaking News Ghugus city @news • बहिरम बाबा देवस्थानाच्या समोरून जाणाऱ्या वेकोलिच्या रेल्वे लाईनला...

Ghugus city @news • बहिरम बाबा देवस्थानाच्या समोरून जाणाऱ्या वेकोलिच्या रेल्वे लाईनला घुग्गुस वासियांचा तीव्र विरोध • बहिरम बाबा देवस्थानाच्या गेट समोरून रेल्वे लाईन जाऊ देणार नाही- विवेक बोढे

61

Ghugus city @news
• बहिरम बाबा देवस्थानाच्या समोरून जाणाऱ्या वेकोलिच्या रेल्वे लाईनला घुग्गुस वासियांचा तीव्र विरोध

• बहिरम बाबा देवस्थानाच्या गेट समोरून रेल्वे लाईन जाऊ देणार नाही- विवेक बोढे

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस :येथील कॉ. नं. २ जवळील बहिरम बाबा देवस्थानाच्या समोरून वेकोलिच्या रेल्वे रुटाची लाईन जाणार आहे.

वेकोलि वणी क्षेत्राच्या पैंनगंगा, मुंगोली कोळसा खाणीतून नकोडा मार्गे बहिरम बाबा देवस्थान ते घुग्घुसच्या जुन्या रेल्वे सायडींग पर्यंत नवीन रेल्वे रूट लाईन वेकोलितर्फे कोळसा वाहतुकीसाठी टाकण्यात येत आहे.

ही रेल्वे लाईन बहिरम बाबा देवस्थानाच्या गेट समोरून टाकण्यात येणार असल्याने याचा विरोध करण्यासाठी देवस्थान कमेटीचे सदस्य, भाजपा नेते, काँग्रेस नेते व शहरवासिय देवस्थानाजवळ गोळा झाले व त्याठिकाणी वेकोलि अधिकाऱ्यांना व रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले.

बैठकी दरम्यान बहिरम बाबा देवस्थानाच्या समोरून वेकोलितर्फे टाकण्यात येणाऱ्या रेल्वे रुटाचा विरोध करण्यात आला हा रेल्वे रूट देवस्थानाच्या मागून टाकण्यात यावा अशी मागणी करण्यात आली तसेच बहिरम बाबा देवस्थानच्या गेट समोरून रेल्वे लाईन टाकू देणार नाही असा इशारा भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी बैठकी दरम्यान दिला आहे. याप्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी शहरवासियांना दिले.

बहिरम बाबा देवस्थान हे घुग्घुसचे
कुलदैवत आहे याठिकाणी भाविक नवस व विविध कार्यक्रम करीत असतात तसेच दर्शनासाठी ही नागरिक येतात.
देवस्थानाच्या गेट समोरून वेकोलिच्या रेल्वे रुटाची लाईन गेल्याने भाविकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागणार आहे तसेच प्रदूषणामुळे देवस्थानाचे सौंदर्य खराब होणार आहे त्यामुळे देवस्थान गेट समोरून जाणाऱ्या रेल्वे रुटाच्या लाईनला विरोध करण्यात येत आहे.

यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे संजय तिवारी, देवस्थान कमेटीचे शाम आगदारी, राजेश मोरपाका, माजी सरपंच संतोष नुने, रत्नेश सिंग, काँग्रेस नेते पवन आगदारी, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, साजन गोहणे, संजय तगरम, सिनू कोत्तूर, विनोद आगदारी व देवस्थान कमेटीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.