Home Breaking News Bhadravti taluka@ news • “वृत्तपत्र व प्रसार वाहिनी” जनहिताचे प्रश्न सोडविण्याचे एक...

Bhadravti taluka@ news • “वृत्तपत्र व प्रसार वाहिनी” जनहिताचे प्रश्न सोडविण्याचे एक माध्यम -रवींद्र तिराणिक*

132

Bhadravti taluka@ news
• “वृत्तपत्र व प्रसार वाहिनी” जनहिताचे प्रश्न सोडविण्याचे एक माध्यम -रवींद्र तिराणिक*

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत :तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती- वृत्तपत्र व दृक श्राव्यमाध्यमे हे लोकशाही मधील चौथ्या भूमिकेतून आपले अभिमत स्वतंत्रपणे व्यक्त करण्याचे एक माध्यम असून त्याचा सुयोग्य वापर जनहिताच्या प्रश्नासाठी झाला पाहिजे. पत्रकार बांधवांनी आपली प्रतिभा ढासळू न देता स्वच्छ प्रणाली बाळगत आपले पत्रकारितेचे मूल्य खऱ्या अर्थाने जोपासत जनहिताच्या कल्याणार्थ वापरले तर लोकशाहीची ताकद तुमच्या पाठीशी उभी राहील व किंबहुना पत्रकारांवरती हल्ले होणार नाहीत, हल्लेखोरांची तुमच्याकडे वक्रदृष्टी करून बघण्याची हिंमत होणार नाही असे स्वतंत्र अभिमत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख, जनमंच सदस्य, राष्ट्रीय स्तरावरील’ द” पोस्ट मीडिया समूहाचे कार्यकारी संपादक रवींद्र तिराणिक यांनी व्यक्त केले. भद्रावती येथील साई आयटीआय सेमिनार हॉल मध्ये आयोजित विविध प्रचार व प्रसार जनसंवाद माध्यम तथा द ट्रायबल पोस्ट मीडिया समूहाच्या एका विशेष बैठकीत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

वृत्तपत्र प्रसार माध्यमे यातील (नवीन तंत्रज्ञान अभ्यासगत माहिती) जाणून घेण्यासाठी विविध पातळीवरील नव्याने- नव्या दमाने येऊ इच्छिणाऱ्या प्रतिनिधीसाठी जिल्ह्यात एक स्वतंत्र अभिनव कार्यशाळा घेण्याचा निर्धारही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

आयटीआय सेमिनार हॉल मधील बैठकीचे आयोजन (जनसंवाद प्रचार व प्रसार माध्यम) चंद्रपूर गडचिरोली संपर्कप्रमुख किशोर पत्तीवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनात करण्यात आले होते प्रसंगी प्रमुख अतिथी मनोज मोडक लॉर्ड बुद्धा Tv channel प्रतिनिधी, जिल्हा ब्युरो शशिकांत मोकाशे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पारखी, लोकमत चंद्रपूर भूषण पुरस्कार प्राप्त परमानंद तिराणिक यांचे प्रामुख्याने उपस्थिती होती .

सुरुवातीला सदर बैठकीत महाराष्ट्र राज्याच्या शासकीय पत्रकार अधीस्वीकृती समिती मंडळावरील अध्यक्षपदी यदुनाथ जोशी यांची निवड झाल्याबद्दल प्रचार व प्रसार माध्यम ,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, राष्ट्रीय स्तरावरील द ट्रायबल पोस्ट मीडिया समूहाच्या वतीने तिराणिक यांनी अभिनंदनचा प्रस्ताव पारित केला. प्रसंगी चंद्रपूर भूषण पुरस्कार प्राप्त परमानंद तिराणिक यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. विशेष बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शशिकांत मोकाशे यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष प्रा. भूषण वैद्य यांनी केले. बैठकीत विजय ठेंगणे, दशरथ वाघमारे, मोहन घोग, रवींद्र कोंगरे आधी अनेक सदस्यांची उपस्थिती होती.