Home Breaking News Bhadrawati taluka@news • सिलंबम मार्शल आर्टस् ट्रेंनिग सर्वच...

Bhadrawati taluka@news • सिलंबम मार्शल आर्टस् ट्रेंनिग सर्वच स्टुडंन्ट्स ला अनिवार्य होणे गरजेचे:सौ अनिता कुमारी •अध्यक्षा-महिला कल्याण समिती,आयुध निर्माणी चांदा

273

Bhadrawati taluka@news

• सिलंबम मार्शल आर्टस् ट्रेंनिग सर्वच स्टुडंन्ट्स ला अनिवार्य होणे गरजेचे:सौ अनिता कुमारी
•अध्यक्षा-महिला कल्याण समिती,आयुध निर्माणी चांदा

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत : तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती – स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया द्वारा मान्यता प्राप्त सिलंबम मार्शल आर्टस् हा प्राचीन भारतीय पारंपरिक युद्धकला – शस्त्रकला खेळ आज केंद्र सरकारने तामिळनाडू चा पारंपरिक खेळ म्हणून खेलो इंडिया गेम्स मधे समाविष्ट करून देशातील सर्व शालेय व महाविद्यालयिन खेळाडू ना अनेक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली आहे.

आपल्या देशात सर्व ग्रामीण व शहर स्तरावर हा खेळ आत्मरक्षणा करीता सर्वश्रेष्ठ खेळ म्हणून लोकप्रिय होत आहे. तेव्हा सिलंबम मार्शल आर्टस् ट्रेंनिग सर्वच स्टुडंन्ट्स ला अनिवार्य होणे गरजेचे – असे आवाहन मुख्य अतिथी अनिता कुमारी मॅडम ( अध्यक्षा – महिला कल्याण समिती , आयुध निर्माणी चांदा ) यांनी केले आहे.

ऑल इंडिया सिलांबम फेडरेशन, महाराष्ट्र सिलांबम स्पोर्टस असोसिएशन च्या चंद्रपुर जिल्हा शाखा – ऑल चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुर सिलांबम असोसिएशन, व डिफेन्स परिसरात विविध क्रीडा प्रकारचे एकमात्र व्यासपीठ रूपाने लोकप्रिय “आयुध मल्टिपरपज अमेचुर स्पोर्ट्स अकादमी , आयुध निर्माणी चांदा” यांच्या संयुक्त विद्यमाने “तृतीय जिल्हास्तरीय सिलांबम”(लाठीकाठी , दांडपट्टा , तलवारबाजी व अन्य शस्त्र कला खेळ चे ) प्रशिक्षण शिबीर दिनांक 29 ते 30 आगस्ट 2023 ला आयोजन अंकुर विद्या मंदीर स्कूल ,डिफेन्स, भद्रावती येथे करण्यात आले.

या कॅम्प ला मुख्य मार्गदर्शक मास्टर संजय बनसोडे सर ,( छत्रपती शिवाजी महाराज कालीन शस्त्र विद्या – सिलांबम, मर्दानी खेळ एक्सपर्ट ,पुणे )
महाराष्ट्र प्रमुख – ऑल इंडिया सिलांबम फेडरेशन , सोबत मास्टर चक्रधर सूर्यवंशी ,मास्टर प्रीतम सोनवने ( सिलांबम , मर्दानी खेळ नॅशनल चॅम्पियन पुणे)यांनी सर्व स्टुडंन्ट्स ना प्रशिक्षण दिले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वाल्मिक खोब्रागडे,अध्यक्ष – जिल्हा सिलांबम असोसिएशन
( जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक ,व लाठीकाठी क्रीडा प्रकाराचे चे 67 वर्षीय अनुभवी सीनियर कोच ),
प्रा. दुष्यंत नगराळे उपाध्यक्ष – जिल्हा सिलांबम असोसिएशन( स्टेट सिलांबम रेफेरी – व सीनियर सिलांबम , मार्शल आर्टस् कोच )
रेंशी दुर्गराज एन रामटेके ( स्टेट रेफरी – सिलांबम )
संस्थापक व सेक्रेटरी – ऑल चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुर सिलंबम असोसिएशन , चंद्रपुर) , जिल्हा सहसचिव बंडू करमनकर( राजुरा) श्रीहरी गसकंटी ( NIS – SAI कोच) , कोरपना तालुका कोच संदीप पंधरे इत्यादि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

कॅम्प च्या यशस्वी आयोजना करिता संजय माटे, गौतम भगत , अंकुश भोयर, क्रिश भोस्कर ,करण नेवारे,दीक्षांत रामटेके, आयुषी रामटेके, आर्या कामरे, दिव्या गेडाम, शोर्या रामटेके, तंनू आडे,हरिप्रिया बाभुलकर, पलक शर्मा, आचल हिवरकर,नियाशा साहू , कन्यका राऊत,समीक्षा बोधाने, माधवी बोधाने ,यशस्वी कावरे व आयुध मल्टिपरपज अमेचुर स्पोर्टस अकादमी,अंकुर विद्या मंदीर स्कूल , डिफेन्स , भद्रावती चे सर्व स्टुडंन्ट्स यांनी प्रयत्न केला.