Home Breaking News Ballarpur city @ news • जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या...

Ballarpur city @ news • जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेला लोकसहभागातून प्राप्त झाले सिलिंग फॅन.

98

Ballarpur city @ news

• जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेला लोकसहभागातून प्राप्त झाले सिलिंग फॅन.

सुवर्ण भारत:संजय घुग्लोत(उपसंपादक)

बल्लारपुर:जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेला लोकसहभागातून दोन सिलिंग फॅन प्राप्त झाले आहे. यासंबंधी दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. बी.भगत मुख्याध्यापक होते. प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बी. पी. चिकाटे व सौ. सारिका दिनेश शेंडे उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ यांची मंचावर उपस्थिती होती.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बी. पी. चिकाटे व पालक शिक्षक संघ च्या उपाध्यक्षा सौ. सारिका दिनेश शेंडे यांच्या हस्ते बी. बी. भगत मुख्याध्यापक यांना सिलिंग फॅन सुपूर्त करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे बी. पी. चिकाटे, सारिका शेंडे यांनी आपले विचार व्यक्त केले तसेच अध्यक्षीय भाषण बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन एस. एन. लोधे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन आर. के. वानखेडे यांनी केले.

कार्यक्रमात एम. डी. टोंगे, आर. बी. अलाम, एस. एम. चव्हाण, वामन बोबडे, वाल्मीक खोंडे, इंद्रभान अडबाले आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.