Home Breaking News Chandrapur city@ news • येत्या ५ सप्टेंबरला शिक्षक भारती काळ्या फीती...

Chandrapur city@ news • येत्या ५ सप्टेंबरला शिक्षक भारती काळ्या फीती लावून करणार निषेध !

64

Chandrapur city@ news
• येत्या ५ सप्टेंबरला शिक्षक भारती काळ्या फीती लावून करणार निषेध

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:सध्या राष्ट्रीय कार्याच्या नावाखाली शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. शिक्षकांना अध्यापन सोडून इतर कोणतीही अशैक्षणिक कामे सांगायला नको आहे .पण सध्या अध्यापन सोडून इतर सर्व अशैक्षणिक कामे करुन घेतली जात आहेत हे दुर्दैवी आहे.आम्हाला शिकवू द्या अशी शिक्षकांना मागणी करावी लागत आहे.आजपर्यंत शिक्षक भारतीच्या माध्यमातून व शिक्षक आमदार कपिल पाटीलयांचे मार्गदर्शनात आणि म. रा. प्रा. शिक्षक भारती अध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे बंद करावीत या मागणीसाठी शासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा केलेला आहे. पण शासन दखल घेत नसल्यामुळे शिक्षक भारतीच्या वतीने दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी शिक्षक दिनी शिक्षक शासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून शाळेत दिवसभर काळ्या फीती लावून अध्यापन करण्यात येणार आहे.

५ सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन!हा दिवस देशातील प्रत्येक शिक्षकांसाठी महत्वाचा असतो.या दिवशी शिक्षकांचा देशभर गौरव व सन्मान होत असतो.पण अशैक्षणिक कामाच्या ओझ्यात शिक्षक भरडला जात आहे. आम्हाला शिकवू द्या अशी शिक्षकांची मागणी आहे.अशैक्षणिक कामे आणि ऑनलाईन कामांमुळे शिक्षक बेजार झाला आहे.अशैक्षणिक कामांचा निषेध करण्यासाठी शिक्षक काळ्या फिती लावून शासनाचा निषेध करणार असल्याची माहिती शिक्षक भारती चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सुरेश डांगे यांनी आज या प्रतिनिधीला दिली आहे.