Home Breaking News Bhadrawati taluka@news • भद्रावती पोलीस स्टेशन , ग्रामीण रुग्णालयात व...

Bhadrawati taluka@news • भद्रावती पोलीस स्टेशन , ग्रामीण रुग्णालयात व शिवालय मध्यवर्ती कार्यालयात  रक्षाबंधन कार्यक्रम •शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) महिला आघाडी व युवती सेनेचा उपक्रम

129

Bhadrawati taluka@news

• भद्रावती पोलीस स्टेशन , ग्रामीण रुग्णालयात व शिवालय मध्यवर्ती कार्यालयात  रक्षाबंधन कार्यक्रम
•शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) महिला आघाडी व युवती सेनेचा उपक्रम

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत :तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती -शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पूर्व विदर्भ महिला संपर्क प्रमुख शिल्पा बोडखे यांच्या मार्गदर्शनात  महिला आघाडी व युवती सेनेच्या संयुक्त विद्यमाने
तसेच वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांच्या सहकार्याने  पोलीस स्टेशन , ग्रामीण रुग्णालय आणि  शिवालय मध्यवर्ती कार्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी पोलीस स्टेशमधील पोलीस अधिकारी व कर्मचारीवृन्द , ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी आणि कर्मचारी वृन्द तसेच शिवसैनिक, पदाधिकारी  व नागरिकांना  उपस्थित महिला -भगिनींनी राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
   याप्रसंगी महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर , जिल्हा युवती सेना अधिकारी  प्रतिभा मांडवकर आणि माजी नगरसेविका सुषमा शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात महिला उपजिल्हाप्रमुख माया नारळे,  शहर समन्वय संघटिका भावना खोब्रागडे,  तालुका संघटिका अश्लेषा जिवतोडे, शहर संघटिका माया टेकाम , दर्शना तेलरांधे,रजनी बावणे, वच्छला रामटेके, कमला मत्ते, जया दाते, नलिनी मांडवकर , राधा  पारपल्लीवार, नितू शिंदे, प्रतिभा लांडे, प्रियंका मत्ते, लता ठेंगणे, रजनी डबरे, आशा बाविस्कर, विजया बद्दीलवार आणि  शीला आगलावे यांच्यासह महिला आघाडी आणि युवती सेनेच्या सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.