Home Breaking News •”राष्ट्रवादी संगे मंगळागौर” राज्यस्तरीय स्पर्धा! • स्पर्धेत सहभागी होण्याचे देवकी शिंदे यांचे...

•”राष्ट्रवादी संगे मंगळागौर” राज्यस्तरीय स्पर्धा! • स्पर्धेत सहभागी होण्याचे देवकी शिंदे यांचे आवाहन !

203

•”राष्ट्रवादी संगे मंगळागौर” राज्यस्तरीय स्पर्धा!
• स्पर्धेत सहभागी होण्याचे देवकी शिंदे यांचे आवाहन !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

मुम्बई:राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली खा.सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी संगे मंगळागौर ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयोजित करण्यात आली असून सदरहु स्पर्धा ही येत्या ११सप्टेंबरला दुपारी २ते संध्याकाळी ५ वाजे पर्यंत मुंबईच्या (प्रभादेवी)रविन्द्र नाट्यमंदिरात होत असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्ष देवकी संतोष शिंदे यांनी आज या प्रतिनिधीस दिली.

आयोजित या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३ लाख रुपयांचे असून द्वितीय पारितोषिक २ लाख रुपयांचे आहे तर याच स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकांचे पारितोषिक १ लाख रुपयांचे ठेवण्यात आले आहे.या शिवाय काही उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या मंगळागौरी ग्रुपचा ड्रेपरी परिधान केलेला १० मिनिटांचा नवीन व्हिडिओ शूट करून 7620734057 या क्रमांकावर पाठवावा.
व्हिडिओसोबतच आपल्या ग्रुप मधील सर्व महिलांची नावे व मोबाईल नंबर हे देणे हे अत्यंत आवश्यक आहे.

सदरहु स्पर्धेसाठी व्हिडिओ पाठवित असताना कुठल्याही प्रकारे जुन्या कार्यक्रमातील व्हिडिओ किंवा या पूर्वीचे परफॉर्मन्स व्हिडिओ पाठवू नयेत ते या स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.

ज्या प्रकारे आपण कार्यक्रमात सादरीकरण करणार आहात त्याच प्रकारे १० मिनिटांचा व्यवस्थित रेकॉर्ड केलेला व्हिडिओ पाठविण्यात यावा याची नोंद घ्यावी.एका ग्रुप मध्ये कमीत कमी १० व जास्तीत जास्त १४ महिलांचा सहभाग असावा.आयोजित या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वय कमीत कमी १८ वर्षे अथवा त्यापुढील असावे.

व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख ही बुधवार दि. ०६ सप्टेंबर रात्री १०.०० वाजेपर्यंत राहील. स्पर्धेसाठी प्राप्त झालेल्या व्हिडिओच्या गुणवत्तेनुसार स्पर्धेत सादरी करण्याचा क्रम ठरविण्यात येईल. स्पर्धेबाबत अधिक माहिती साठी 7620734057 या क्रमांकावर व्हाट्सअप संदेश करावा.किंवा संपर्क साधावा. या स्पर्धेत परीक्षकांनी घेतलेला निर्णय हा अंतिम राहील.