Home Breaking News Bhadravti taluka@ news •भद्रावती (पिपरी) येथे शिक्षकदिन साजरा!

Bhadravti taluka@ news •भद्रावती (पिपरी) येथे शिक्षकदिन साजरा!

180

Bhadravti taluka@ news
•भद्रावती (पिपरी) येथे शिक्षकदिन साजरा!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

भद्रावती: तालुक्यातील पिपरी (दे) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत काल मंगळवार दि.५ सप्टेंबरला शिक्षकदिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला भद्रावती स्थित व्हर्च्युअस मल्टिपर्पज संस्थेच्या कर्मचारी तथा पिपरी( दे.) येथील तंटामुक्ती समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष कलावती कोडापे , शाळेचे मुख्याध्यापक संजय मासळकर,शाळेचे विद्यार्थी व गावातील गणमान्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या आरंभी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.या वेळी शाळेचे मुख्याध्यापक मासळकर तसेच शाळेचे शिक्षक भगत यांनी मार्गदर्शन करीत आपल्या भाषणातून शिक्षकदिनाचे महत्व उपस्थितीतांना पटवून दिले.कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.