Home Breaking News ◽◼️विशेष लेख◼️◻️ • मराठी भाषेची शिक्षणातील गळचेपी ! 🟡🔸वैशाली राऊत...

◽◼️विशेष लेख◼️◻️ • मराठी भाषेची शिक्षणातील गळचेपी ! 🟡🔸वैशाली राऊत सहज सुचलं सदस्य नागपूर

189

◽◼️विशेष लेख◼️◻️
• मराठी भाषेची शिक्षणातील गळचेपी !

🟡🔸वैशाली राऊत सहज सुचलं सदस्य नागपूर

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

“सर्व भाषेचा गोडवा माझ्या मराठीत मिळे
“अमृतहूनी गोड माझी माय मराठी “.
संतांनी गायिलेली ही मराठीची महती अगदीच पूरक आहे.खरंच मराठी भाषेत असलेली आपुलकी ,जिव्हाळा, प्रेम आपल्याला कुठे मिळूच शकत नाही. छोट्या बाळाच्या तोंडून आई ताई, माय हे शब्द ऐकताना जो गोडवा वाटतो तो मम्मी या शब्दात जाणवतं नाही.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेता कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो .मराठी भाषा सर्वसामान्य लोकांना कळावी म्हणून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाची निर्मिती केली.
संत एकनाथांनी लोकांना अंधश्रद्धा, वाईट रूढी,परंपरा,समाजातील अनिष्ट चालीरीती यातून बाहेर काढण्याकरिता मराठी भाषेत भावार्थ रामायण,चतू:श्लोकी भागवत,भारुड इ.ग्रंथांची रचना करून मराठी भाषेचा गोडवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविला.

दोन पिढी अगोदर शिक्षण हे मोठ्या संख्येनी मराठी माध्यमातून घेतले जायचे त्यामूळे त्या पिढीजवळ मराठी भाषेचा मोठा शब्दसंग्रह होता. पर्यायी शब्दही भरपूर व्यवहारात वापरले जायचे. या कालावधीत मराठी नाटक,सिनेमा,गीतकार, कवी,कवयत्री मोठ्या प्रमाणात उदयास आले.

पण आता खेदाची बाब आहे की परिस्थिती खूप विपरीत आहे. मराठी भाषा अस्ताला जात आहे की काय? असे वाटायला लागले आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर जर ‘हो’ असेल तर मग याला जबाबदारही आपणच आहोत.आज पालकांचा आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा जो कल दिसून येत आहे त्यातून इंग्रजी भाषेचे झालेले आक्रमण,मराठी भाषेकडे उच्चशिक्षित लोकांचा पाहण्याचा संकुचित दृष्टिकोन,इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी भाषेची सक्ती न करणे, पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण,आजच्या स्पर्धेच्या युगात आर्थिक हव्यासापोटी शैक्षणिक क्षेत्रात चाललेली जीवघेणी स्पर्धा, विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे मराठी भाषेची गळचेपी होत आहे.

उच्च शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून असल्यामुळे या विषयाचे ज्ञान असणे आवश्यक आहे पण त्याच बरोबर मराठी भाषेला तिचे गतवैभव प्राप्त होण्याकरिता , मुलांच्या सर्वांगीण मानसिक विकासासाठी मराठी भाषा सर्व स्तरावर सक्तीची करण्यात यावी.