Home Breaking News Chandrapur dist@ news • जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रभावी प्रचार व प्रसार आवश्यक -अंधश्रद्धा...

Chandrapur dist@ news • जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रभावी प्रचार व प्रसार आवश्यक -अंधश्रद्धा निर्मूलना वरील परिसंवादातील सूर

57

Chandrapur dist@ news
• जादूटोणाविरोधी कायद्याचा प्रभावी प्रचार व प्रसार आवश्यक -अंधश्रद्धा निर्मूलना वरील परिसंवादातील सूर

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

चंद्रपूर: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय चंद्रपूर तर्फे कामगार कल्याण केंद्र मूल रोड येथे वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांतर्गत अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. सदरहु कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर अलॉय संयंत्र इंटक कामगार संघटनेचे महासचिव चंद्रशेखर पोडे होते प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अनिल दहागांवकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे यांची उपस्थिती होती तर इंटकचे कार्याध्यक्ष बाबाराव मून, शिक्षक विजय रानकीर्तीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी अनिल दहागावकर व धनंजय तावाडे यांनी जादूटोणा विरोधी कायद्यासह अंधश्रद्धांशी संबंधित बुवाबाजी, भूत, भानामती, तंत्र, मंत्र, जादूटोणा, वैज्ञानिक दृष्टिकोन आदी विषयांवर चमत्कार भंडाफोड प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जादूटोणाविरोधी कायद्याच्या जनजागृती सोबतच प्रभावी अंमलबजावणी होणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.

चंद्रशेखर पोडे, बाबाराव मून, विजय रानकीर्तीवर यांनीही आपले याप्रसंगी समयोचित विचार व्यक्त केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मध्यवर्ती कार्यालय मुंबईचे कल्याण आयुक्त रविराज ईळवे, विभागीय कार्यालय नागपूरचे सहायक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांच्या मार्गदर्शनात आणि चंद्रपूर गट कार्यालयाचे कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर अळणे यांच्या प्रयत्नाने आयोजित सदरहु कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन केंद्र संचालक सुरेश इटनकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कल्याण सहायिका छाया गिरटकर, केंद्र सेविका सुमन दुर्गे यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला कामगार कुटुंबीय, महिला आणि विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती..