Home Breaking News Chandrapur dist@ news • एससी, एसटी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना...

Chandrapur dist@ news • एससी, एसटी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या- उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडेंची मागणी

52

Chandrapur dist@ news
• एससी, एसटी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या- उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडेंची मागणी

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत.अशातच एससी, एसटी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी चंद्रपुरातील उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी आज केली आहे.तसेच एससी ,एसटी ,ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखिल झोडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून दिला आहे.

काही राजकीय पक्ष ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण द्या तसेच ओबीसींचा आरक्षणाचा टक्का वाढवून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करत आहेत.मात्र ओबीसी बांधवांनी याला तीव्र विरोध दर्शविला आहे.मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलने, निदर्शने व मोर्चे काढले जात आहेत. शिंदे-फडणवीस-पवार सरकार मात्र अजूनही लक्ष द्यायला तयार नाहीत.त्यामुळे येत्या काही दिवसात आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही .तर काही दिवसांपूर्वी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे.

याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत महाराष्ट्रात पुन्हा आंदोलन सुरू झाले आहे. काही राजकीय पुढारी ओबीसींच्या आरक्षणातुन मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करत आहेत.दरम्यान एससी, एसटी, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी चंद्रपुरातील उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.