Home Breaking News Chimur taluka @news •स्वयंसिद्धा संस्थेकडून राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमाचे प्रशिक्षकांना आर्थिक...

Chimur taluka @news •स्वयंसिद्धा संस्थेकडून राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमाचे प्रशिक्षकांना आर्थिक मोबदला देण्यास होतेयं टाळाटाळ! • प्रशिक्षकांची आर्थिक फसवणूक झाल्याची पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दाखल • जुण्या आर्थिक व्यवहाराची पूर्तता केल्याशिवाय नवीन प्रशिक्षणाचे काम थांबवा- डॉ. सुशांत इंदोरकर यांची वरिष्ठांकडे मागणी

62

Chimur taluka @news

•स्वयंसिद्धा संस्थेकडून राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमाचे प्रशिक्षकांना आर्थिक मोबदला देण्यास होतेयं टाळाटाळ!
• प्रशिक्षकांची आर्थिक फसवणूक झाल्याची पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दाखल
• जुण्या आर्थिक व्यवहाराची पूर्तता केल्याशिवाय नवीन प्रशिक्षणाचे काम थांबवा- डॉ. सुशांत इंदोरकर यांची वरिष्ठांकडे मागणी

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

नेरी (चिमूर):विद्यार्थिनींना गुन्हेगारी विरुद्ध लढण्यासाठी सक्षम करणे यासाठी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रम अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. या आधुनिक युगातही विद्यार्थिंनी पूर्णपणे सुरक्षित नाहीत त्यासाठी विद्यार्थिनींना संरक्षणाचे प्रशिक्षण व तंत्रज्ञान यांचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे . तद्वतच अनुभवी मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांकडून मुलींनी सुरक्षित वातावरणात व्यावहारीक संरक्षण तंत्र शिकणे आवश्यक आहे. यासाठी मे. स्किल ट्री कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेडची सेवा पुरवठाधारक म्हणून निवड करण्यात आली. त्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे .त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील शाळेतील मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण प्रशिक्षकांमार्फत मार्शल आर्टच्या किमान एक शैली मध्ये कुशल करण्यासाठी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळांमधील मुलींसाठी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमांतर्गत स्वरक्षण प्रशिक्षण जीवनशैली प्रशिक्षक

श्रद्धा किनाके मास्टर ट्रेनर यांना सदरहु उपक्रम तालुका स्तरावर राबविण्यासाठी जबाबदारी देण्यात आली होती.
चंद्रपूर जिल्ह्यातील शाळेत डॉ. सुशांत काशिनाथ इंदोरकर यांना “विद्या किनाके व श्रद्धा किनाके” यांचेकडून शाळेत कराटे प्रशिक्षण देण्यासाठी कराटे प्रशिक्षक म्हणून विद्या किनाके भद्रावती यांनी संपर्क साधून स्वयंसिद्धा या संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत प्रशिक्षण देण्यासाठी कराटे प्रशिक्षणाचे काम दिले. दरम्यान डॉ. सुशांत इंदोरकर व त्यांच्या सहकार्यांनी दोन फरवरी 2023 ते 15 एप्रिल 2023 या कालावधीत चिमूर तालुक्यातील साठ शाळा, सिंदेवाही तालुक्यातील 30 शाळा, नागभीड तालुक्यातील 33 शाळा ,व राजुरा तालुक्यातील 58 शाळांमध्ये प्रशिक्षण देण्याचे काम यशस्वीरीत्या केले .त्यात त्यांनी 22 ते 25 प्रशिक्षकांची नेमणूक करून शाळेत कराटे प्रशिक्षण पूर्ण केले. परंतु स्वयंसिद्धा संस्थेकडून बोटावर मोजण्या इतक्या प्रशिक्षकांना काही प्रमाणात मोबदला देऊन काही प्रशिक्षकांना काहीच आर्थिक मोबदला न देता, प्रशिक्षकांना आर्थिक मोबदला देण्यास त्या आता टाळाटाळ करीत आहेत. फोनवर संपर्क केल्यास त्या उडवा उडवीचे उत्तर देत असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे त्यामुळे या सर्व प्रशिक्षकांची आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार डॉ. सुशांत इंदोरकर यांनी चंद्रपूर पोलिस अधिक्षक यांना केली आहे.या शिवाय चंद्रपूर जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेला देखिल या बाबतीत सविस्तर लेखी तक्रार दिली असल्याचे डॉ.इंदोरकर यांनी या प्रतिनिधीस चंद्रपूर मुक्कामी सांगितले.

पहिलेच जुन्या कराटे प्रशिक्षणाचे काम करणाऱ्या प्रशिक्षकांना आर्थिक मोबदला न देता त्यांची फसवणूक करून , याच संस्थेमार्फत एक सप्टेंबर 2023 पासून परत नवीन प्रशिक्षण देण्याचे काम करण्यात येणार आहे याची माहिती व्हाट्सअप द्वारे सर्व विभाग प्रमुखांना माहिती दिलेली आहे त्यामुळे अजून अन्य लोकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही करिता संबंधित संस्था व व्यक्तींबाबत योग्य ती चौकशी करून कठोर कारवाई करावी .तोपर्यंत पुन्हा प्रशिक्षणाचे काम सदरहु स्वयंसिद्धा संस्थेमार्फत चंद्रपूर जिल्ह्यात देऊ नये असे केलेल्या तक्रारीत डॉ.इंदोरकर यांनी नमुद केले आहे.