Home Breaking News ♦️◽घुंगुरवाळा♦️◽ ◽♦️प्रा. सुनंदा पाटील सहज सुचलं मार्गदर्शिका मुंबई सुवर्ण...

♦️◽घुंगुरवाळा♦️◽ ◽♦️प्रा. सुनंदा पाटील सहज सुचलं मार्गदर्शिका मुंबई सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

60

♦️◽घुंगुरवाळा♦️◽

◽♦️प्रा. सुनंदा पाटील सहज सुचलं मार्गदर्शिका मुंबई

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

🔸दारात मूक हा पडला घुंगुरवावाळा
मज एकदाच ये भेटाया घननीळा ॥धृ॥

तव आठव भरला हृदयाचा गाभारा
गोठ्यात गाईचा मुक्त विखुरला चारा
परसात अजुनही रिक्त असे हिंदोळा ॥१॥

🔸हे घडे दुधाचे भरून माझ्या दारी
जाहली कधी ना दह्यादुधाची चोरी
नवनीत चाखण्या दावी पुन्हा तव चाळा ॥२॥

🔸का विसरुनी गेला मुरली माझ्या ठायी
घुंगरू पायीचे पुन्हा बोलले नाही
ते सूर ऐकण्या आतुरल्या व्रजबाला ॥३॥

🔸अक्रुरास विनवू हात जोडुनी पायी
चौघडे थांबले मूक पावरी होई
रासात रंग तू भरण्या ये गोपाळा ॥४॥

मज एकदाच ये भेटाया घननिळा

◽♦️प्रा. सुनंदा पाटील सहज सुचलं मार्गदर्शिका मुंबई