Home Breaking News chandrapur city@ news • महिलांसाठी सुलभ शौचालय उपलब्ध करून द्या -वंचित बहुजन...

chandrapur city@ news • महिलांसाठी सुलभ शौचालय उपलब्ध करून द्या -वंचित बहुजन महिला आघाडीची चंद्रपूरच्या जिल्हाधिका-यांकडे मागणी ! • महिला शिष्टमंडळाने सादर केले निवेदन!

116

chandrapur city@ news
• महिलांसाठी सुलभ शौचालय उपलब्ध करून द्या -वंचित बहुजन महिला आघाडीची चंद्रपूरच्या जिल्हाधिका-यांकडे मागणी !
• महिला शिष्टमंडळाने सादर केले निवेदन!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत: उपसंपादक

चंद्रपूर:समाजात ब-याच प्रमाणात डिजीटल लाॅईफ झालं असलं तरी महिलांच्या समस्या ह्या तेवढ्याच महत्वाच्या आहेत.या समस्या कडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वप्रथम शौचालय हा मुद्दा चंद्रपूर वंचित बहुजन महिला आघाडीने हाती घेतला आहे.आज सोमवार दि.११ सप्टेंबरला दुपारी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना “महिलांसाठी शौचालय उपलब्ध करून द्या “या मागणीचे एक लेखी निवेदन सादर केले.दरम्यान त्यांनी तहसिल कार्यालय चंद्रपूर हे अतिशय महत्त्वाचे ठिकाण असून देखील या ठिकाणी महिलांसाठी सुलभ शौचालय नसल्याची खंत या निवेदनात नमूद केली आहे.

शहरासोबतच ग्रामीण भागातून शासकीय कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या महिलांना ही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते .या शिवाय जिल्हाधिकारी कार्यालया लगत असलेल्या शौचालयाची अवस्था फार बिकट असून आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते शौचालय योग्य आहे का? असा सवाल देखिल महिला आघाडीने दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे.

येत्या आठ दिवसांत या ठिकाणी सुलभ शौचालयाची व्यवस्था करुन देण्यात यावी अशी रास्त मागणी त्यांनी याच निवेदनातून केली आहे.निवेदन सादर करताना वंचित बहुजन महिला आघाडीच्या महानगर अध्यक्ष तनुजा रायपूरे,संघटिका परिणिता मेश्राम, उपाध्यक्ष सुलभा चांदेकर,इंदूताई डोंगरे, पौर्णिमा जुनघरे, चंद्रप्रभा रामटेके, प्रज्ञा रामटेके, तृप्ती उराडे, शोभा नरवाडे,किरण गौरकार,अल्का वाळके,स्वाती वाळके,रेखा उमरे, अरुणा नगराळे, अर्चना भसारकर, अश्विनी नखाडे, पुष्पा साव, ज्योति उंदिरवाडे, आशा उराडे आदिं उपस्थित होत्या.