Home Breaking News chandrapur city@ news • चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविन्द्र टोंगेंचे अन्नत्याग...

chandrapur city@ news • चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविन्द्र टोंगेंचे अन्नत्याग आंदोलन आरंभ!

152

chandrapur city@ news
• चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविन्द्र टोंगेंचे अन्नत्याग आंदोलन आरंभ!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत: उपसंपादक

चंद्रपूर:ओबीसीची जात निहाय जनगणना झाली पाहिजे , मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये. कुणबी प्रमापत्र देऊ नये. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकाने जातनिहाय सर्वे लवकरात लवकर सुरू करावा.

ओबीसी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन वसतिगृह जिल्हावार सुरू करावे या सोबतच स्वाधार योजना सुरू करण्यात यावी आदिं प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघचे जिल्हाध्यक्ष रविन्द्र टोंगे यांनी आज सोमवार दि. ११सप्टेंबर पासून स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १२ वाजेपासून अन्नत्याग आंदोलन आरंभ केले आहे.दरम्यान या आंदोलनाला जनतेकडून उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत असल्याचे वृत्त आहे.अनेकांनी आज या आंदोलनस्थळाला भेटी देवून टोंगे यांचेशी सविस्तर चर्चा केली आहे.