Home Breaking News Chandrapur city@ news • आश्वासनांची पूर्तता नाही ;उलगुलान कामगार संघटनेचे साखळी उपोषण...

Chandrapur city@ news • आश्वासनांची पूर्तता नाही ;उलगुलान कामगार संघटनेचे साखळी उपोषण सुरू

46

Chandrapur city@ news
• आश्वासनांची पूर्तता नाही ;उलगुलान कामगार संघटनेचे साखळी उपोषण सुरू

सुवर्ण भारत:किरण घाटे (उपसंपादक)

चंद्रपूर:आश्वासनांची पूर्तता न केल्याने उलगुलान कामगार संघटनेने वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनी विरोधात मेजर गेटसमोर आज पासून साखळी उपोषण सुरू केले आहे.मागील कित्येक वर्षांपासून कुणाल कंपनीत कंत्राटी कामगार काम करीत आहेत.मात्र त्यांचे वेतन नियमित होत नाही, त्यांचे भविष्य निर्वाह निधी कापल्या जात नाही,कुशल कामगारांना वेतन वाढ दिल्या जात नाही, इतकेच नव्हे तर कुणाल कंपनीच्या ठेकेदाराकडून कामगारांना कामावरून काढून टाकण्याची वारंवार धमकी सुद्धा दिल्या जाते.या सर्व बाबी कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी, वीज केंद्राचे मुख्य अभियंता यांना वारंवार निदर्शनास आणून दिल्या.मात्र कंपनीवर अजूनही कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

उपरोक्त प्रकारांमुळे कामगारांच्या मानसिकतेचे खच्चीकरण होत असून कामगारांचे वेतन वेळेत देण्यात यावे, भविष्य निर्वाह निधी कपात करण्यात यावा, कामगारांना वेतन वाढ देण्यात यावी यासह अन्य मागण्यांना घेऊन 5 सप्टेंबर पासून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.हे सर्वश्रूतच आहे.याच आंदोलनाचा धसका घेत वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनीच्या व्यवस्थापनाने कामगार संघटनेची बैठक घेतली.या बैठकीत कामगारांच्या मागण्या मान्य करत असल्याचे लेखी आश्वासन सुद्धा देण्यात आले.मात्र अजूनही मागण्यांची पूर्तता न केल्याने आज पासून मेजर गेट समोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

आंदोलन स्थळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, रवि पवार,पवन भगत, नंदलाल वर्मा,गुरु भगत,कुणाल चौधरी, सुमित भिमटे,मगेश बदकल,अक्षय राऊत,अभय सपाट,अमर गोलटकर, शाम चुके,मोनू मटाले,प्रतीक मानकर, प्रफुल्ल सोनट्टके, प्रवीण मडावी,सुधीर डाहाकी,आंनद पुणेकर,राजु जगने, प्रदीप झामरे,प्रफुल्ल पाटील, राहुल वाभले आदि उपस्थित असल्याचे दिसून आले.