Home Breaking News Chandrapur dist @news • चंद्रपूरच्या सुपरिचित कवयित्री उज्वला नगराळे काव्यरत्न पुरस्काराने सन्मानित...

Chandrapur dist @news • चंद्रपूरच्या सुपरिचित कवयित्री उज्वला नगराळे काव्यरत्न पुरस्काराने सन्मानित ! •साहित्य क्षेत्रातील मंडळींनी केले नगराळे यांचे अभिनंदन!

59

Chandrapur dist @news
• चंद्रपूरच्या सुपरिचित कवयित्री उज्वला नगराळे काव्यरत्न पुरस्काराने सन्मानित !

•साहित्य क्षेत्रातील मंडळींनी केले नगराळे यांचे अभिनंदन!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:सुशीला वाकडे बहुउद्देशीय संस्था निकतवाडा, जिल्हा गडचिरोली अंतर्गत सुशीला काव्यविचार साहित्य मंचच्या वतीने राज्यस्तरीय डॉ .बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वितरण सोहळा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगरभवन कार्यालयात नुकताच रविवारी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजताच्या दरम्यान पार पडला .सदरहु आयोजित सोहळ्यात एकूण १२ पुरस्कारकर्त्यांना पुरस्कार बहाल करण्यात आले . चंद्रपूरच्या सुपरिचित कवयित्री उज्वला वाल्मिक नगराळे यांना या समारंभात या वेळी सोपानदेव मशाखेत्री यांच्या हस्ते राज्यस्तरीय काव्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नगराळे ह्या विविध कविसंमेलनात आपल्या कवितांच उत्तम व सुरेखरित्या सादरीकरण करीत असतात .या शिवाय त्या थोर पुरुषांच्या जिवनावर , सामाजिक व ज्वलंत विषयावर काव्यरचना शब्दांकित करीत असतात.शेतकरी व विधवा स्त्रियांची व्यथा मांडून कवितेत सुंदरता आणण्याचा त्या नेहमीच प्रयत्न करीत असतात.श्रोत्याच लक्ष वेधून घेणार्‍या व कवितेचे सुरेख सादरीकरण करणार्‍या कवयित्री पैकी त्या एक कवयित्री आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.उज्वला यांचे शिक्षण एम ए इतिहास मराठी समाजशास्त्र बी एड असून त्या सध्या इतिहास या विषयात अहिल्याबाई होळकर यांच्या सर्वांगीण कार्यावर संशोधन करीत आहे.आज पर्यंत त्यांनी विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे .त्यांच्या या विशेष उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना काव्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.नगराळे यांना उपरोक्त पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातील मंडळीं कडुन त्यांचे अभिनंदन होत आहे.