Home Breaking News Pune dist@ news • शुभांगी शिंदे लिखित पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण समारंभ...

Pune dist@ news • शुभांगी शिंदे लिखित पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण समारंभ थाटात संपन्न

56

Pune dist@ news
• शुभांगी शिंदे लिखित पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण समारंभ थाटात संपन्न

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

पूणे : संत गाडगे महाराज साहित्य विचार मंच ओतुर व ज्ञानज्योत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शुभांगी शिंदे  लिखित कथासंग्रह
कुंकू व कविता संग्रह युगंधर यशोदिप पब्लिकेशन प्रकाशित प्रकाशन सोहळा,राज्य स्तरीय ज्ञानज्योत पुरस्कार 2023 व काव्य गौरव पुरस्कार वितरण समारंभ थाटात व उत्साहात संपन्न झाला.
      सदरहु  सोहळ्याचे उद्घाटन आपला माणूस मारूती तुपे (आबा) यांनी महामानवांच्या प्रतिमेचे पुजन करून केले. प्रास्ताविक भाषण कवयित्री कांचन मून यांनी केले.पुस्तक प्रकाशन सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा संचालन निवेदन वनशिव यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रा. अनिल शिंदे व रघूनाथ कांबळे यांनी केले.
      
समारंभाला उपस्थित जेष्ठ साहित्यिक व गोल्ड कवी म.भा.चव्हाण यांच्या हस्ते दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडला. मनोगत व्यक्त करताना त्यांनी पुस्तक प्रकाशन व कवींचे आणि लेखकांचे जीवन कसे घडते हे या वेळी सांगितले.कुंकू कथा संग्रहाची प्रस्तावना जेष्ठ  कथाकार  बबन पोतदार यांनी केली त्यांनी आपल्या मनोगतात कुंकू या पुस्तकाचे महत्त्व पटवून दिले.युगंधर या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे लोककवी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी यशोदिप पब्लिककेश प्रकाशिक्षण रूपालीताई ,साहित्य सम्राट पुणेचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टूळ ,जेष्ठ साहित्यिक व कवी मदन देगावकर यांनी ही संक्षिप्त शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.  प्रमुख पाहूणे
दस्तूर  काॅलेजचे प्राचार्य दिनेश देवकर व प्रशांत सुरवसे यावेळी मंचावर उपस्थित होते.
  

ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय  ज्ञानज्योत साहित्य सेवा पुरस्कार 2023अमोल घाटविसावे यांना देण्यात आला.राज्यस्तरिय ज्ञानज्योत पर्यावरण रक्षक पुरस्कार अशोक वाघमारे ,जितेन सोनावणे व सुनिता पवार (गवळी) यांना देण्यात आला. यावेळी पुरस्कार  मानपत्राचे वाचन कविता काळे व कांचन मून यांनी केले.
   
दोन्ही संस्थेमार्फत साहित्य सम्राट लोकशाहीर  अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यस्पर्धा घेण्यात आली त्यात प्रथम क्रमांक सुभा लोंढे पुणे व्दितीय क्रमांक बबन चव्हाण पुणे,तृतीय क्रमांक राजेंद्र साबळे ओतुरकर ठाणे यांनी मिळविला उत्तेजनार्थ क्रमांक अनिल नाटेकर आळंदी व अंजली सामंत डहाणू यांना देण्यात आला या सर्व विजेत्यांना काव्य गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. ज्ञानज्योत संस्थेचे ग्राफिक्सकार आदित्य मुन, सौजन्य मुर्ती उषा भरणे,संदिप सातपुते, करूणा कंद यांचा ही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

संमेलन अध्यक्ष जेष्ठ गझलकार उद्धव महाजन यांनी यावेळी आपले मत व्यक्त करित उत्तम मार्गदर्शन केले व आपली सुरेख गझल सादर केली.
यानंतर सत्र दुसरे कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान नानाभाऊ माळी पुणे यांनी भुषविले .यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.अश्विनी वाळके यांनी कविसंमेलनाचे सुत्रसंचालन केले .

यावेळी अरूण कांबळे,  उमा लुकडे, सागर वाघमारे,सुभा लोंढे,डाॅ शुभा लोंढे,सनी बोरसे,सुरज अंगुले,सूर्यकांत नामुगडे,किशोर टिळेकर,जनाबापू,चंद्रकांत जोगदंड ,शुभम चांदणे ,विकी कांबळे, तानाजी शिंदे यांनी आपल्या उत्तम रचना सादर केल्या.कार्यक्रमाची सांगता सत्कारमुर्ती लेखिका शुभांगी शिंदे यांनी उपस्थितीतांचे आभार मानले . कार्यक्रमाचे आयोजन सत्य गाडगेमहाराज साहित्य विचार मंच महाराष्ट्र राज्यचे संस्थापक रणजित पवार,कोषाध्यक्ष गणेश पुणे, ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यच्या संस्थापक अध्यक्ष कविता काळे व संस्थापक कार्याध्यक्ष कांचन मून ,सदस्य शुभांगी शिंदे यांनी केले.
हा सोहळा हडपसर येथील  कन्यादान मंगल कार्यालयात संपन्न झाला.