Home Breaking News Chandrapur dist@ news • वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण सुरूच ;अजून...

Chandrapur dist@ news • वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण सुरूच ;अजून घेतली नाही या आंदोलनाची कोणी दखल! • मंडपातच केले परिवार सोबत सामुहिक भोजन

45

Chandrapur dist@ news
• वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण सुरूच ;अजून घेतली नाही या आंदोलनाची कोणी दखल!

• मंडपातच केले परिवार सोबत सामुहिक भोजन

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी मंगळवार पासून मेजर गेट समोर साखळी उपोषण सुरू केले आहे.दरम्यान गुरुवारी तिसऱ्या दिवशी ही हे साखळी उपोषण सुरूच होते .आज त्यांनी वर्गणी गोळा करीत मंडपात परिवारांसोबत सामुहिक भोजन केले असल्याचे राजू झोडे यांनी या प्रतिनिधीस सांगितले.वीज केंद्रातील खासगी कंपनी असलेल्या कुणाल कंपनीत कंत्राटी पद्धतीने शेकडों कामगार काम करीत आहेत.

अशातच नियमानुसार या सर्व कामगारांचे पीएफ कपात करणे बंधनकारक असताना सुद्धा कुणाल कंपनीच्या व्यवस्थापनाने मागील सात वर्षांपासून कामगारांचे पीएफ कपात केले नाही. तर दुसरीकडे कामगारांचे वेतन सुद्धा 2 ते 3 महिने उशिरा देण्यात येत आहे. या सर्व बाबी कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी राजू झोडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार पासून साखळी उपोषण सुरू केले आहे.दरम्यान पीएफचे कपात न केल्याने यात लाखोंची अफरातफर झाल्याची बाब सुद्धा उघडकीस आली असल्याचे कामगारांनी म्हटले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कुणाल कंपनीत कंत्राटी कामगार काम करत आहेत.मात्र त्यांचे वेतन नियमित होत नाही, त्यांचे भविष्य निर्वाह निधी कपात केल्या जात नाही,कुशल कामगारांना वेतन वाढ दिल्या जात नाही, इतकेच नव्हे तर कुणाल कंपनीच्या ठेकेदाराकडून कामगारांना कामावरून काढून टाकण्याची वारंवार धमकी देखील दिल्या जाते.या सर्व बाबी कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी, वीज केंद्राचे मुख्य अभियंता यांना वारंवार निदर्शनास आणून दिल्या.मात्र कंपनीवर अजून पर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही.

उपरोक्त प्रकारांमुळे कामगारांच्या मानसिकतेचे खच्चीकरण होत असून ते मंगळवार पासून मेजर गेट समोर साखळी उपोषणास बसले आहे.दरम्यान तिसऱ्या दिवशी ही हे उपोषण सुरूच असून आज वर्गणी गोळा करून आंदोलनकर्त्यांनी उपोषण मंडपातच सामुहिक भोजन केले.यावेळी रवि पवार, श्याम झिलपे, मंगेश बदकल,कुणाल चौधरी सुमित भिमटे अक्षय राउत अभय सपाट शाम चुके मोनू मटाले प्रतीक मानकर प्रफुल्ल सोनट्टके प्रवीण मंडावी सुधीर डाहाकी आनंद पुणेकर राजु जागने प्रफुल्ल पाटिल राहुल वाभले यांच्यासह उलगुलान कामगार (आंदोलक )व त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.